फर्स्ट कॉपीचा ‘बाजार’; ब्रॅंडेडच्या नावाखाली बनावट वस्तूंचा सुळसुळाट

ग्राहकांची सर्रास लूट
pcmc news
बनावट वस्तूंचा सुळसुळाटपुढारी
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात 'ब्रॅंडेड’च्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची विक्री सर्रास सुरू आहे. कपड्यांपासून मोबाईल अ‍ॅक्सेसरिज, विद्युत उपकरणांना ‘फर्स्ट कॉपी’चा टॅग लावून ग्राहकांना फसवले जात आहे. यातील विशेष बाब म्हणजे कंपनीच्या प्रतिनिधींकडून तक्रार मिळाल्यावरच प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

आजच्या गतिमान जीवनशैलीत ग्राहक अधिक 'ब्रॅंडेड' ओरिएंटेड झाले आहेत. मोठ्या कंपन्यांचे लोगो, आकर्षक पॅकिंग आणि मॉडर्न डिझाईन पाहून ग्राहक सहजपणे आकर्षित होतात.

या मानसिकतेचा गैरफायदा घेत काही दुकानदार, वितरक आणि ऑनलाइन विक्रेते बनावट वस्तूंना ‘फर्स्ट कॉपी’, ‘ओव्हर स्टॉक माल’, ‘डायरेक्ट फॅक्टरी प्रॉडक्ट’ अशा गोंडस नावाखाली बाजारात आणत आहेत. अशा बनावट वस्तूंमध्ये प्रामुख्याने कपडे, बूट, मोबाईल स्क्रीन व चार्जर, तसेच मिक्सर, हेअर ड्रायर, वायरिंग साहित्य यांसारख्या इलेक्ट्रिक उपकरणांचा समावेश आहे. या वस्तू दिसायला मूळ उत्पादनासारख्या असल्या तरी प्रत्यक्ष वापरात त्यांचा काही उपयोग होत नाही.

विशेष मोहीम गरजेची

बनावट वस्तूंचा सुळसुळाट ग्राहकांची फसवणूक आहे; तसेच बाजारपेठेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रत्येक वस्तूची खरेदी काळजीपूर्वक करावी, तरच ही फसवणूक थांबेल. पोलिस प्रशासन, ग्राहक हक्क संघटना आणि ब—ँडेड कंपन्यांनी मिळून या बनावट विक्रेत्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर परिणाम

बनावट वस्तू फक्त ग्राहकांचे नुकसान करत नाहीत, तर ब—ँड कंपन्यांची बाजारातील प्रतिमा आणि विश्वासार्हतेवरही आघात करतात. तसेच, काही इलेक्ट्रिक उपकरणांमुळे जीवितहानीसुद्धा होऊ शकते. अशा उत्पादनांवर त्वरित बंदी आणि कडक कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

टोळ्यांच्या मुळाशी जाणे गरजेचे

या बनावट वस्तू केवळ स्थानिक स्तरावर बनवलेल्या नसतात. त्यांचा स्रोत पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, दिल्ली यासारख्या राज्यांतील उत्पादन केंद्रांशी संबंधित आहेत. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक विक्रेत्यांकडून माहिती घेऊन मूळ टोळ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news