Private Tuition Ban Teachers: तळेगाव दाभाडे शाळांमध्ये शिक्षकांच्या खासगी शिकवणीवर कारवाईचे आदेश

तळेगाव दाभाडेतील अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या खासगी शिकवणी वर्गांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले
Coaching Classes Fees
Coaching Classes FeesPudhari
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे: शहरातील अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील काही शिक्षकांकडून सुरू असलेल्या सशुल्क खासगी शिकवणी वर्गांविरोधात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तळेगाव शहर युवक काँग््रेासच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नगर परिषद शिक्षण मंडळाने अशा शिकवणी वर्गांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Coaching Classes Fees
Kundmala Bridge Issue: कुंडमळा पूल दुर्घटनेला एक वर्ष; अद्याप पुनर्बांधणी नाही, पर्यटक त्रस्त

युवक काँग््रेासचे शहराध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज व युवक काँग््रेासच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी शिक्षण मंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. शहरातील काही अनुदानित शाळांमधील शिक्षक शाळेतील अध्यापनाबरोबरच खासगी शिकवणी वर्ग चालवत असल्याने विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडत असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

Coaching Classes Fees
Pimpri CNG Shortage: पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजी तुटवडा; रिक्षाचालकांना तासन्तास रांगा

या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रशासन अधिकारी अनिता वैद्य यांनी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्पष्ट निर्देश दिले. शासन नियम व नगर परिषद सेवक आचारसंहितेनुसार शिक्षकांनी खासगी शिकवणी घेणे नियमबाह्य असल्याचे त्यांनी आदेशात नमूद केले आहे.

Coaching Classes Fees
Sanitary Pad Disposal Issue: पिंपरीत सॅनिटरी पॅड विल्हेवाटीचा मोठा प्रश्न; कचरावेचकांना धोका

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, तसेच शाळांमधील अध्यापन प्रक्रिया अधिक सक्षम व पारदर्शक राहावी, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Coaching Classes Fees
Ravet Blasting Accident: पिंपरी-रावेतमध्ये परवानगीशिवाय ब्लास्टिंग; मजुराच्या पायाला गंभीर दुखापत

यासोबतच संबंधित संस्थांनी शिक्षकांकडून मी कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी घेत नाही, अशा आशयाचे हमीपत्र घेण्याचेही आदेश प्रशासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त होत असून, शिक्षण व्यवस्थेत शिस्त व पारदर्शकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news