Ravet Blasting Accident: पिंपरी-रावेतमध्ये परवानगीशिवाय ब्लास्टिंग; मजुराच्या पायाला गंभीर दुखापत

रावेत येथील बीआरटी रोड साईटवर परवानगीशिवाय ब्लास्टिंगदरम्यान स्फोट होऊन मजूर गंभीर जखमी झाला. दोन कंत्राटदारांवर गुन्हा दाखल
Blast
BlastPudhari
Published on
Updated on

पिंपरी: रावेत येथे कोणतीही परवानगी न घेता करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे एका मजुराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी दोन कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौक नवीन बीआरटी रोडवरील 108 आस्टोरिया साईट येथे घडली.

Blast
Bank Account Freeze Cyber Crime: सायबर गुन्ह्यांच्या तपासात बँक खाती फ्रीज; नागरिकांना आर्थिक त्रास

बबलू शेख (वय 35) असे जखमी मजुराचे नाव आहे. पोलिस शिपाई दशरथ सदगीर यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शशिकांत राघवशरण श्रीवास्तव (55, रा. ताथवडे) आणि सचिन शंकर चव्हाण (23, रा. कुरुळी, खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे.

Blast
Pimpri Chinchwad Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर वसुलीचा विक्रम! दोन महिन्यांत 230 कोटींचा महसूल जमा

आरोपींनी ब्लास्टिंगसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. तसेच, सर्व जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला की नाही याची खातरजमा न करता मजूर बबलू शेख याला पुन्हा त्याच ठिकाणी ड्रील मशीनने होल घेण्यास सांगितले. त्या वेळी अचानक स्फोट होऊन बबलू शेख याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news