Supriya Sule
हिंजवडीतील समस्या सोडविण्यासाठी एकत्र या; खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहनFile Photo

Hinjawadi Development Issues: हिंजवडीतील समस्या सोडविण्यासाठी एकत्र या; खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

Supriya Sule latest news: पाहणी दौरा झाल्यानंतर खा. सुळे यांनी हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली
Published on

Supriya Sule on Hinjawadi Problems

पिंपरी: आयटीनगरी असा जगभर लौकिक असलेला हिंजवडी आणि परिसर गेल्या अनेक दिवसांपासून समस्यांना तोंड देत आहे. या परिसराची खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (दि. 4) येथे पाहणी करत समस्या सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी, पीएमआरडीए, एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्‍यांनी एकत्र यावे. या सर्वांची मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

हिंजवडी व आसपासच्या परिसराची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, आधी हा परिसर खूप सुंदर होता. या परिसरातून कोट्यवधी रुपयांचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो; परंतु गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा आला आहे. विकास होत असताना बकालपणा वाढला आहे. (Latest Pimpri News)

Supriya Sule
PMRDA: अवघे दोनच अधिकारी अतिक्रमण हटविणार कसे? ‘पीएमआरडीए’ची अतिक्रमणविरोधी कारवाई लांबणार

विशेषत: नाल्यांवर झालेली बांधकामे, नालेसफाई याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. मी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, महापालिका, एमआयडीसीचे अधिकारी, स्थानिक आमदार व इतर लोकप्रतिनिधींसोबत संपर्कात असून, या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पाहणी दौरा झाल्यानंतर खा. सुळे यांनी हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, पीएमआरडीए, एमआयडीसी व पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, आयटी अभियंते व प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी त्यांनी हाऊसिंग सोसायटीधारकांची समस्या समजून घेतल्या.

Supriya Sule
Pimpri Crime: प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा गळा दाबून खून

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाहतूक कोंडी, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, ड्रेनेजलाईन यंत्रणा या विषयांवर चर्चा केली. त्याबाबत अधिकार्‍यांना सूचनाही केल्या. येत्या 26 जुलैला पुन्हा एकदा बैठक घेऊन मागील कामाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित यंत्रणांकडून काम न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत हिंजवडीसह सात गावे समाविष्ट करण्याबाबतच्या मुद्द्यावर त्यांनी सावध पवित्रा घेत स्पष्ट भाष्य टाळले.

हिंजवडीसाठी सक्षम स्वतंत्र प्राधिकरणाची गरज

हिंजवडी व आसपासच्या परिसरासाठी स्वतंत्र सक्षम प्राधिकरणाची गरज असल्याचे खा. सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, पुन्हा याबाबत पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रीय महामार्गाबाबत भूसंपादनाची त्यांनी माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news