Sant Tukaram Maharaj Palkhi Departure: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान

मुसळधार पावसातही हरिनामाचा अखंड गजर; फुगड्या, टाळ-मृदंग आणि विठ्ठलभक्तीने देहूनगरी दुमदुमली
Sant Tukaram Maharaj Palkhi
Sant Tukaram Maharaj PalkhiPudhari
Published on
Updated on

देहूगाव: संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा।।... या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वर्णनानुसार पंढरीची ओढ, विठ्ठलनामाची तळमळ आणि भक्तीचा आविष्कार मंगळवारच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात अक्षरशः साकार झाल्याचे भावपूर्ण चित्र देहूनगरीत पाहायला मिळाले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवार (दि. ७) दुपारी ४ वाजता श्रीक्षेत्र देहूगाव येथील मुख्य मंदिरातून पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात पावसाचा कहर! २४ तासांत ६२५ मिमी पाऊस; टाटा धरण ओव्हरफ्लो, शहर जलमय

या वेळी मंदिर परिसरात मानाच्या दिंड्यांचे वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात वारकरी भक्तांनी फुगड्या, खेळ आणि भक्तिरंगात रंगून एकमेकांच्या चरणी नतमस्तक होत गळाभेट घेतली. परस्परांची खुशाली विचारत, 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात देहूनगरी न्हाऊन गेली. या वेळी वरुणराजानेही जणू या भक्तिसोहळ्याला साक्षी राहण्यासाठी हजेरी लावली. पावसाच्या सरी अंगावर घेत वारकरी ओलेचिंब होऊन देहभान विसरून नाचत, बागडत विठ्ठलनामात तल्लीन झाले होते. प्रत्येक थेंब हा जणू विठ्ठलाची कृपावृष्टीच असल्याचा अनुभव भाविक घेत होते.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pimpri Chinchwad Fire Brigade: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग अलर्ट; पूर बचावासाठी यंत्रणा सज्ज

नामघोषात वारकरी दंग

मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा मुख्य मंदिरातून बाहेर पडताच “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम”च्या नामघोषांनी परिसर दुमदुमून गेला. अभंगगायन सुरू असतानाच वरुणराजाने पुन्हा कृपावृष्टी करत या सोहळ्याचे स्वागत केल्याचे भाविकांनी अनुभवलं. टाळकरी, वारकरी ओलेचिंब अवस्थेतही देहभान हरपून नाचत, आनंदोत्सव साजरा करत होते. अभंग आरतीनंतर अब्दागिरी, भागवत धर्माच्या पताका तसेच बाभूळकर व मोहिते पाटील यांच्या मानाच्या अश्वांसह हा पालखी सोहळा भक्तिरसात न्हाऊन निघत पुढे मार्गस्थ झाला.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pimpri Chinchwad Heavy Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा विक्रम; १५ वर्षांतील सर्वाधिक २०६.५ मिमी पाऊस, शहर जलमय

इनामदार वाड्यात मुक्काम

अखेर या दिव्य आणि अलौकिक वातावरणात पालखी सोहळ्याने इनामदारसाहेब वाडा येथे पहिल्या मुक्कामासाठी विसावा घेतला.

वैष्णवांचा आनंदोत्सव

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूनगरीत हजारो वारकरी, वैष्णव भाविकभक्त दाखल झाले होते. वरुण राजाने सकाळपासूनच हलक्या सरींचा वर्षाव करून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे स्वागत केले. भर पावसात वारकरी भाविकभक्त टाळ, मृदंगाचा गजर आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानोबा, तुकोबांच्या नामघोषाने अवघी देहूनगरी दुमदुमली आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Sant Tukaram Maharaj Palkhi: देहूनगरीत भक्तीचा महासागर; संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांचा महासागर

अनेक वारकरी भाविकभक्तांनी फुगड्या खेळून, येरे बा विठ्ठला, तू येरे बा विठ्ठला असो नामघोष करून फुगड्या खेळून एकमेकांच्या चरणी नतमस्तक झाले. एकूणच त्यांच्यामध्ये परमानंद जाणवत होता. पोलिस कर्मचाऱ्यांनादेखील या सोहळ्यात 'ज्ञानोबा तुकाराम'च्या नामघोषावर फुगडी घालण्याचा मोह आवरता आला नाही. आपल्या डोईवर तुळशी वृंदावन, विठ्ठल रखुमाईची मूर्ती, संबळचा निनाद, विठ्ठल, विठ्ठल हरिनामाचा गजर अशा प्रसन्न वातावरणात हा फुगड्यांचा खेळ रंगला होता. संत तुकाराम महाराज मुख्य गाभारा, भजनी मंडप, राम मंदिर, शिळा मंदिर, महाद्वार यांना विविध रंगीबेरंगी फुलापानांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news