Pimpri Chinchwad Heavy Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा विक्रम; १५ वर्षांतील सर्वाधिक २०६.५ मिमी पाऊस, शहर जलमय

नदीकाठच्या घरांत पाणी शिरले; अंडरपासमध्ये धबधब्यासारखा प्रवाह, प्रशासन आणि एनडीआरएफची मदतकार्ये सुरू
Pune Rain Update
Pune Rain UpdatePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाने नुसती हजेरीच लावली नाही, तर मुसळधारेने शहरवासीयांची दाणादाण उडवली. सोमवार (दि. ६) पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहर जलमय झाले होते. रस्त्यावरून पाण्याचे मोठे लोट वाहत होते. त्यामुळे नागरिकांना कामानिमित्त घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. सगळीकडे पाणीच पाणी, अशी उद्योगनगरीची दैनावस्था झाली होती.

Pune Rain Update
Sant Tukaram Maharaj Palkhi: देहूनगरीत भक्तीचा महासागर; संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांचा महासागर

सोमवारी पहाटे ते दिवसभराच्या पावसाने पवना, इंद्रायणी तसेच मुळा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या २४ तासात २०६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही गेल्या १५ वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Pune Rain Update
Pimpri Chinchwad Flood Situation: पिंपरी-चिंचवडमध्ये पुराचा विळखा; नदीकाठच्या घरांमध्ये पाणी, नागरिकांचे स्थलांतर

सोसायट्या, घरांत शिरले पाणी

पावसाचा जोर एवढा होता की, शहर परिसरातील अनेक सोसायट्या, घरे, वस्त्यांत पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम करत होते. एकूणच मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्किळीत झाल्याचे चित्र होते.

कामानिमित्त नागरिकांची बाहेर पडताना तारांबळ झाली. कर्मचारी, व्यावसायिक, नोकरदार आज छत्री, रेनकोट असूनही निम्मे अर्धे भिजले होते. रस्त्यावरील पथारी, हातगाडीवाले यांच्यादेखील व्यवसायावर परिणाम झाला. पावसामुळे बाजार, भाजीमंडईमध्ये नागरिक फिरकले नाहीत. एकंदरीतच सोमवारी दिवसभर शहर परिसरात केवळ मुसळधार पावसाने नागरिकांचे बेहाल झाले.

Pune Rain Update
Pimpri Chinchwad Road Potholes: पावसात पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांची चाळण; खड्डे आणि पाणी साचल्याने नागरिक हैराण

वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, पिंपरी, रावेत, रहाटणी, सांगवी, कासारवाडीतील नदीपात्राजवळ राहणार्‍या नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नदीकाठी वास्तव्य करणार्‍या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, धोकादायक स्थळांच्या ठिकाणी वास्तव्यास असणार्‍यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले असून तेथे भोजनासह आवश्यक सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रशासन अलर्टवर

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका आणि एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

Pune Rain Update
PM Crop Insurance Scheme: मावळातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करा

भक्ती-शक्ती अंडरपासमध्ये धबधबा

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते; तसेच येथील अंडरपासमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून येत होते. पाण्याचे प्रमाण एवढे होते की, येथून धबधबा वाहत आहे, असे चित्र निर्माण झाले होते. येथून वाहणारे पाण्याचे लोट बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती; मात्र सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिसांनी येथे बॅरिकेडस् लाऊन येथील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती.

गेल्या १५ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक

पिंपरी-चिंचवड शहरातील ६ जुलै रोजी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याआधी २०१०, २०१४, २०१५, २०२०, २०२२,२०२४ वर्षात १०० मिलीमीटरच्या पुढे पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये २०१० - ५ ऑक्टो २०१० मध्ये १८१.१ मिलीमीटर आणि २५ जुलै २०२४ मध्ये १७५ मिलीमीटर ही सर्वाधिक नोंद होती. यंदा सोमवार (दि. ६) रेकॉर्डब्रेक २०६. ५ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news