Pimpri Ramzan Dates Prices: रमजानमध्ये खजुरांना वाढती मागणी; पिंपरी बाजारात 300 ते 1200 रुपयांपर्यंत दर

अजवा, कलमी, फरद, मगजोलसह विविध प्रकार उपलब्ध; आवक कमी झाल्याने भावात वाढ
Dates
DatesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: रमजान म्हणजे मुस्लिमांचा पवित्र महिना. रमजान महिन्यात रोजे असतात. याच रोज्याच्या दरम्यान उपवासासाठी हमखास खजूर खरेदी केले जातात. हे उपवास सुरु झाले असल्याने विविध प्रकारचे खजूर पिंपरी- चिंचवडच्या बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झाले आहेत.

Dates
Moshi Spa Prostitution Case: मोशी प्राधिकरणात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; एकाला अटक

बाजारपेठेत अजवा, सुलतान, केरमन, फरद, अजवा, साद, रुक्साना, मदजूल, रॉयल, किंग, पेंड खजूर, मगजोल , किमया, यास्मिन , फरद , कलमी, इराणी, सुशीला, गुलाबी , ग्रीन फरद आदी खजूर बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामध्ये इराणचे खजूर स्वस्त आहेत तर ओमनचे खजूर महाग आहेत. खजूर खरेदी करण्यासाठी पिंपरी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहेत .

Dates
Pimpri Chinchwad Juvenile Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये बालगुन्हेगारीत घट; विशेष बाल पोलिस पथकाच्या उपक्रमांचा परिणाम

हे सर्व खजूर इराण, अफगाण या पर देशामधून आपल्या भारतीय बाजारपेठेत विक्रीस येतात. यंदाच्या वर्षी खजुराची आवक कमी झाल्यामुळे भावात काहीशी वाढ झाली आहे. बाजारात 300 रूपयांपासून ते 1200 रूपयांपर्यंत खजूर विक्रीस उपलब्ध आहेत.

Dates
Pimpri Underground Tunnel Project: रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी 32 हजार कोटींचा भुयारी मार्ग प्रकल्प

खजूर दर पुढीलप्रमाणे:

कलमी 400 रुपये, मगजोल 1200, फरद 700 रुपये, अजवा 550 रुपये, साद 480, रुक्साना 600 -700, किमया 360, जास्मिन 900 रूपये.

Dates
Navlakh Umbare Crematorium Issue: बधलवाडीत स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित; ग्रामस्थ आक्रमक

इराण आणि अफगाण देशातून खजूर विक्रीस येतात. मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू असताना खजुराची मागणी वाढते.

मनोहर जेठवानी (विक्रेते)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news