Ramesh Reddy Case: रमेश रेड्डी खून प्रकरणातील मुख्य आरोपीचे आत्मसमर्पण

एन्काऊंटरच्या भीतीने आफताब शेख न्यायालयात हजर; पोलिस कोठडीची मागणी
Court
CourtPudhari
Published on
Updated on

पिंपरी: भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब समीर शेख याने पोलिसांकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य ‌‘एन्काऊंटर‌’च्या भीतीने वडगाव मावळ येथील न्यायालयात आत्मसमर्पण केले. न्यायालयात सादर केलेल्या लेखी निवेदनात त्याने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.

Court
PCMC Meeting Chaos: पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत गोंधळ; ९ तासांच्या चर्चेनंतर महत्त्वाचे विषय तहकूब

देहूरोड परिसरात 28 एप्रिल रोजी रमेश रेड्डी यांच्यावर 21 हून अधिक गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आफताबसह इतर आरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी आफताब घटनेनंतर फरार होता.

Court
Lonavala Missing Link Selfie Controversy: लोणावळा मिसिंग लिंक: सेल्फी बंदीच्या नियमांवरून महापौर रवी लांडगे वादाच्या भोवऱ्यात

दरम्यान, वडगाव मावळ न्यायालयात आत्मसमर्पण करताना आफताबने देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आपण आरोपी असल्याचे नमूद केले. मात्र, कायद्याच्या प्रक्रियेनुसार कारवाई होण्याऐवजी पोलिसांकडून ‌‘फेक एन्काऊंटर‌’द्वारे आपला जीव घेतला जाऊ शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली. आत्मसमर्पणासाठी नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला असता, “आरोपी दिसताच गोळी घालण्याचे आदेश आहेत,” असे सांगण्यात आल्याचा दावाही त्याने अर्जात केला आहे.

Court
Pimpri Water Supply Problem: दापोडी-कासारवाडी-फुगेवाडीत पाणीटंचाई; कमी दाबाने पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

आफताबने तपास यंत्रणेस पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) ठेवण्याची विनंती केली आहे. यापूर्वी पुणे न्यायालयात केलेला अर्ज अधिकार क्षेत्राअभावी नामंजूर झाल्याने वडगाव मावळ न्यायालयात अर्ज सादर केल्याचेही त्याने स्पष्ट केले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांसह संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू ठेवली होती. मुख्य आरोपीने थेट न्यायालयात हजर होण्याचा मार्ग स्वीकारल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

Court
Lonavala Indrayani River Water Hyacinth: इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात; पावसाळ्यापूर्वी हालचाल

रमेश रेड्डी खुनामागे पूर्ववैमनस्य असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रमेश रेड्डी यांचा भाऊ विक्रम यांच्या खुनातील आरोपी असलेल्या आई व भावाच्या जामिनाला रमेश रेड्डी विरोध करत होता. त्यातून काही महिन्यांपूर्वी धमक्या देण्यात आल्याची माहिती पुढे आली असून, त्यानंतर पाळत ठेवून हा गोळीबार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. दरम्यान, मुख्य आरोपीच्या आत्मसमर्पणामुळे न्यायालयीन प्रक्रियेतून या प्रकरणातील महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्यायालयात आत्मसमर्पण केल्यानंतर आफताब शेख याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, गुन्ह्याच्या तपासकामी त्याला ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मंगळवारी (दि. 5 मे) पोलिसांनी न्यायालयाकडे निवेदन सादर केले आहे. त्यानुसार, आज बुधवारी (दि. 6 ) पोलिस आफताब शेख याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news