Pimpri Chinchwad Property Tax Discount: मालमत्ताकर सवलतीची आज शेवटची संधी; १ जुलैपासून जप्ती मोहीम सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा इशारा; थकबाकीदारांवर कडक कारवाई होणार
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मालमत्ताकरावर दहा टक्के सवलतची मुदत मंगळवार (दि.30) पर्यंत आहे. शेवटचा दिवस शिल्लक असल्याने नागरिकांनी मालमत्ताकर भरून सवलतीचा लाभ घ्यावा. एक जुलैपासून थकबाकीदारांवर कारवाई मोहीम सुरू करण्यात येणार आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

Property Tax
BRTS Security Cabin Encroachment Issue: पिंपळे गुरव बीआरटीएस मार्गावरील सुरक्षा केबिन ठरली अडथळा

शहरातील 7 लाख 44 हजार मालमत्ताधारकांपैकी आतापर्यंत 4 लाख 15 हजार जणांनी एकूण 483 कोटी रुपयांचा कर भरला आहे. सुमारे 3 लाख 46 हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून 10 टक्के सवलत योजनेचा लाभ घेतला आहे.

Property Tax
Katta Culture Decline: मोबाईलमुळे हरवत चालला ‘कट्टा संस्कृतीचा’ संवाद

सवलत योजना संपल्यानंतर 1 जुलैपासून करवसुली मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. थकीत कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. वारंवार आवाहन करून तसेच, जप्तीच्या नोटिसा बजावूनही कर न भरणार्‍या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असे उपायुक्त पवार यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news