

संतोष शिंदे
पिंपरी: मला असा पुरुष हवा आहे, जो मला आई बनवू शकेल, त्यासाठी मी 25 लाख रुपये द्यायला तयार आहे, अशा आशयाचे मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा नवा आणि धोकादायक फंडा बाजारात आणला आहे. पारंपारिक मलोन ॲप, मकस्टम क्लिअरन्स, विदेशी मैत्रीण किंवा जॉब स्कॅम पेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या या मोडस ऑपरेंडीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच बाणेर येथील एका बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टरला अशा प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. या प्रकाराला तरुणवर्ग, अविवाहित पुरुष आणि आर्थिक अडचणीत असलेले पुरुष सहज बळी पडू शकतात, अशी भीती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मपुढारीफशी बोलताना व्यक्त केली आहे.
अशी करतात फसवणूक
फसवणूक करणारे सर्वप्रथम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डेटिंग ॲप किंवा थेट व्हॉट्सॲपवर संपर्क साधतात. स्वतःला उच्चभ्रू कुटुंबातील, श्रीमंत, विवाहित किंवा अविवाहित महिला भासवून अतिशय विश्वासार्ह संवाद साधला जातो. काही प्रकरणांमध्ये तक्रारदारांना चोरटे आपण परदेशात असल्याची माहिती देतात. एकदा विश्वास संपादन झाला की मुख्य मऑफरफ समोर ठेवली जाते ङ्गङ्घमला लग्न न करता मूल हवे आहे. त्याच्या बदल्यात तुला 20 ते 25 लाख रुपये देईन.फफ या प्रलोभनानंतर पुरुषांकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळण्यास सुरुवात होते.
मोबाईल बंद करून आरोपी फरार
पीडित व्यक्ती एकदा पैसे देऊ लागला की चोरटे सतत अधिक रक्कम मागत राहतात. संशय निर्माण होताच सर्व मोबाईल क्रमांक, व्हॉट्सॲप चॅट आणि सोशल मीडिया प्रोफाइल तात्काळ बंद किंवा डिलीट करून आरोपी फरार होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
फसवणुकीसाठी शारीरिक आकर्षणाचा वापर
सायबर चोरटे आता भावनिक आणि शारीरिक आकर्षणाचा वापर करून पुरुषांना लक्ष्य करण्याची नवी पध्दत वापरत आहेत. यात मोठ्या रकमेचे आश्वासन दिले जाते. कोणतेही नाते न जोडता केवळ मदत घेण्याचा दावा केला जातो. चोरटे बनावट ओळखपत्रे, परदेशी क्रमांक, प्रोफेशनल चॅटिंग शैली तसेच व्हिडिओ कॉलचे फेक तंत्रज्ञानाचा वापर करतात. यामुळे समोरची व्यक्ती खरी असल्याचा भम पीडितांच्या मनात निर्माण होते.
फसवणुकीच्या पायऱ्या
पुरुष गळाला लागला की सर्वप्रथम कॉन्ट्रॅक्ट तयार करायचे आहे, असे सांगून रजिस्ट्रेशन फी / करारपत्राचे शुल्क मागितले जाते. त्यानंतर मआयडी व्हीआयपी डेटाबेसमध्ये टाकावी लागेलफ असा बहाणा करून ओळख व्हेरिफिकेशन फी घेतली जाते. नंतर कर भरावा लागेल, तेव्हाच पेमेंट रिलीज होईल, असे सांगत जीएसटी/प्रोसेसिंग चार्ज उकळला जातो. महिलेच्या सुरक्षिततेसाठी हमी रक्कम आवश्यक असल्याचे सांगून सिक्युरिटी डिपॉझिटही घेतले जाते. शेवटच्या टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया आणि गोपनीयता करारासाठी लीगल टीम व वकिलांचे शुल्क मागितले जाते.
सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक भावनांचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे पुरुषांना जाळ्यात ओढत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ममला आई बनवाफ, ममला मूल हवे आहेफ, मपुरुषांनो घरबसल्या पैसे कमवाफ अशा मेसेजला कोणत्याही परिस्थितीत प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकारच्या ऑफर्सना कोणतेही कायदेशीर अस्तित्व नाही. त्यामुळे पुरुषांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे.
प्रवीण स्वामी, सहायक निरीक्षक, सायबर विभाग, पिंपरी-चिंचवड
अशी घ्या खबरदारी
व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही आर्थिक प्रस्तावांवर विश्वास ठेवू नका
अनैतिक किंवा गोपनीय संबंधाबाबत मिळणाऱ्या ऑफर्स खोट्याच असतात
रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन किंवा जीएसटी अशा नावाखाली पैसे मागितले तर त्वरित सावध व्हा
अनोळखी क्रमांकांवरून आलेल्या व्हिडिओ कॉलला प्रतिसाद देऊ नका
मॉडेल्सचे फोटो, फेक प्रोफाइल्स आणि परदेशी क्रमांक असलेले संपर्क क्रमांक त्वरित ब्लॉक करा
फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा
फेसबुकवरील एका व्हिडिओतील आश्वासनावर विश्वास ठेवून मी म झीशसपरपीं गेलफ नावाच्या कंपनीच्या नावाखाली बोलणाऱ्या धर्मेंद्र पटेल व ज्योती शर्मा यांच्या संपर्कात आलो. ओळखपत्र, जीएसटी, टीडीएस, मशीन चार्ज अशा विविध कारणांनी त्यांनी माझ्याकडून सलग रक्कमेची मागणी केली. मी माझ्या स्टेट बँक व युनियन बँक खात्यातून पैसे पाठवले. दरम्यान, आरोपींनी माझा नंबर ब्लॉक केल्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सदाशिव मोरे (नाव बदलले आहे), पीडित व्यक्ती