Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे यांची राजकीय डिप्लोमसी; राहुल कलाटे यांच्यासाठी चिंचवडच्या मैदानात

Maharashtra Assembly Polls:
 Amol Kolhe
डॉ. अमोल कोल्हे यांची राजकीय डिप्लोमसी; राहुल कलाटे यांच्यासाठी चिंचवडच्या मैदानातFile Photo
Published on
Updated on

Pimpri News: दिशा फाउंडेशन आयोजित ’दिवाळी फराळ’ कार्यक्रमानिमित्त खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसर्‍या दिवशी हजेरी लावली. बुधवारी (दि. 30) वाकड येथील दिशा फौंडेशन आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राजकीय फटकेबाजी केली.

सलग दोन दिवस डॉ. कोल्हे चिंचवड मतदारसंघात आहेत. आजच्या कार्यक्रमाला त्यांनी दिलेला वेळ आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी राजकीय डिप्लोमसीची संधी कोल्हे यांनी साधली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 Amol Kolhe
Elections 2024: ज्येष्ठ, रुग्ण, दिव्यांग घरातून करणार मतदान

डॉ. कोल्हे यांचा पिंपरी चिंचवडमधील पहिला कार्यक्रम 2009 साली दिशा सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तेथून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. आज तब्बल 15 वर्षांनी पुन्हा त्यांनी चिंचवड शहरात लक्ष घातले आहे.

वाकड येथील हॉटेल बर्ड व्हॅली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार ड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, राज्य नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे, महायुतीचे उमेदवार शंकर जगताप, सचिन चिखले, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, योगेश बाबर, सचिन साठे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे, सुरेश भोईर, धनंजय काळभोर, तुषार हिंगे, बाळासाहेब मोरे, संतोष कांबळे, महेश कुलकर्णी, अमित बाबर, विशाल यादव आदींनी हजेरी लावली.

लोकसभेला महाविकास आघाडी सोबत नसलेल्या नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. मी, माझा अशी ही निवडणूक नाही. महाराष्ट्रधर्म वाचविण्याची ही निवडणूक आहे. नेत्यांना आता काय वाटते याबद्दल मी बोलणार नाही. नाना काटे यांनी आपले गार्‍हाणे त्यांच्या पक्ष नेत्यांकडे मांडावे. चिंचवडची जागा अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांसाठी सोडवून घेऊ शकले नाहीत हे वास्तव आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका संवादाची आहे. एकदा शून्यावर आउट झाला म्हणजे सचिन पुन्हा सेंचुरी करत नाही असे नाही. त्यामुळे आपण निकालाची वाट बघुयात.

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

महाविकास आघाडीच्या जागा वाटपापूर्वी नाना काटे, चंद्रकांत नखाते, मी, आम्ही सर्व जण पवार साहेबांना भेटलो होतो. बंडखोरी करणार नाही असा शब्द आम्ही साहेबांना दिला होता. साहेबांना शब्द दिल्यानुसार आम्ही समन्वय साधतो आहे. सर्वांसोबत संवाद साधणार. लवकरच वेगळे चित्र दिसेल. कालच्या उमेदवारीच्या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चिंचवडची जनता सुज्ञ आहे. जनता योग्य निर्णय घेईल.

- राहुल कलाटे, उमेदवार, महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news