

Three PMRDA officers transferred
पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विका प्राधिकरणातील वेगवेगळया विभागातील तिघा अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यातील अभियांत्रिकी विभागातील दोघांचा समावेश आहे. तर, लेखा विभागातील एका वरिष्ठ अधिकार्यांची देखील पदोन्नतीने बदली झाली आहे. दरम्यान, नव्या अधिकारयांची प्रतिक्षा असल्याने अतिक्रमण, अभियांत्रिकी, अग्निशमन आणि विकास परवानगी विभागात अनेक पदे रिक्त आहेत.
पीएमआरडीएमध्ये शासकीय विभागातून प्रतिनियुक्तीवर सरकारी अधिकारी यांची नेमणूक केले जाते. त्यानुसार प्रामुख्याने अतिक्रमण, प्रशासन, अभियांत्रिकी आणि विकास परवानगी विभागात त्यांची नियुक्ती करतात. पीएमआरडीएचे कामकाज वाढले असून, हिंजवडी आणि चाकण या दोन्ही भागातील नागरी समस्या आणि कोंडी सोडविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (Latest Pimpri News)
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण विभागातील, विकास परवानगी विभागातील काही अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर आता अभियांत्रिकी विभागातील दोन अधिकारी नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
त्यात कार्यकारी अभियंता म्हणून संदीप खलाटे आणि संजय पाटील या दोघांची पदोन्नती बदली झाली आहे. तर, लेखाविभातील वरिष्ठ अधिकारी बसवेश्वर पाटील यांची देखील अन्य विभागात बदली झाली आहे.
दरम्यान, पीएमआरडीएकडून उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पासंबंधित तक्रारी आणि कामाच्या पाहणीसाठी कार्यकारी अभियंता वेगळी जबाबादारी आहे; मात्र या ठिकाणी अधिकारी टिकत नसल्याचे दिसून येते. यापूर्वी असलेले राजू ठाणगे यांची बदली झाल्यानंतर अधिकारी मिळत नव्हता. तर, आता असलेले संजय पाटील यांची देखील बदली झाली आहे.
पीएमआरडीएमध्ये अधिकार्यांची कमतरता
पीएमआरडीएमधील अभियांत्रिकी विभागातील मुख्य अधिकारी 1 आणि 2 या दोन्ही विभागाचे पद एकाच व्यक्तीकडे आहे. तसेच, विकास परवानगी विभागात दोघा अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ती पदे भरली गेली नाहीत. तसेच, अतिक्रमण विभागात केवळ दोनच अधिकारी असून, जमीन व मालमत्ता विभागातील तहसीलदार यांना तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.