PMRDA: पीएमआरडीएमध्ये कंत्राटी कर्मचार्‍यांचा हॉलिडे मूड; पुण्यातील कार्यक्रमात अधिकारी व्यस्त

कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या
pmrda contract staff
पीएमआरडीएमध्ये कंत्राटी कर्मचार्‍यांचा हॉलिडे मूड; पुण्यातील कार्यक्रमात अधिकारी व्यस्तPudhari
Published on
Updated on

PMRD staff holiday mode

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील आयुक्तांबरोबरच सर्वच विभागातील अधिकारी पुण्यातील बैठकीसाठी गेले होते. परिणामी, आठवड्याचा शेवटचा दिवस कंत्राटी कर्मचार्‍यांनी निवांतपणे घालावला. आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी बाहेर पडताच, कार्यालयात शुकशुकाट होता. विविध कामांसाठी आलेल्यांना नागरिकांना रिकाम्या खुर्च्या आणि टेबल पाहून परत फिरावे लागले.

पीएमआरडीएमध्ये सात ते आठ विविध विभाग आहेत; मात्र शुक्रवार (दि. 1) एकाही विभागात अधिकारी उपस्थित नव्हते, तर अन्य कंत्राटी कर्मचारीदेखील आपल्या जागेवर दिसून आले नाहीत. त्यामुळे कार्यालयात सुरक्षारक्षक, शिपाई वगळता कोणीच नव्हते. काही कार्यालयांत तुरळक प्रमाणात कर्मचारी दिसत होते, तर काही विभागात दरवाजेही बंद होते. कर्मचारी कँटीनमध्ये चहा घेण्यात किंवा गप्पांमध्ये गुंग झाले होते. Latest Pimpri News)

pmrda contract staff
Raksha Bandhan 2025: रंगीबेरंगी आकर्षक राख्यांनी फुलली बाजारपेठ

प्रत्यक्षात पीएमआरडीएमधील सर्व अधिकार्‍यांना भेटण्यासाठी नागरिकांना दररोज दुपारी तीन ते सहा ही वेळ ठरवून देण्यात आली आहे; मात्र असे असतानाही शुक्रवार (दि. 1) कंत्राटी कर्मचारी कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे पीएमआरडीए प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

वरिष्ठच नसल्यामुळे मकोण बोलणार, या मानसिकतेत कर्मचारी पीएमआरडीएच्या गेटच्या बाहेर फिरताना दिसून आले. प्रत्यक्षात त्या त्या विभागाचे प्रमुख बैठकीला गेले असली तरी, इतर अधिकारी देखील जागेवर नव्हते. त्यामुळे या आठवड्यात तीन दिवसांची सुटी अनेकांनी एन्जॉय केल्याची चर्चा पीएमआरडीएमध्ये रंगली होती.

pmrda contract staff
Pimpri Crime: भरदिवसा तरुणावर गोळीबार; पिंपरी कॅम्प परिसरात खळबळ

सोमवारी या, असा सल्ला

पीएमआरडीएमध्ये जवळपास 9 तालुक्यांचे काम चालते. त्यामुळे अनेकजण लांबून कामानिमित्त आले होते; मात्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे तेथील शिपायाने त्यांना सोमवारी या असे सांगितले. तर, काहीजण वाट पाहून तेथून निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news