

पिंपरी: पीएमपीमधून प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी तक्रार कोठे करावी, असा प्रश्न प्रवाशांना समोर निर्माण होतो. यासाठी प्रशासनाने तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे; मात्र हेल्पलाईनवर तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. प्रशासनाकडून तक्रारींचे निराकरण केले जात असल्याचीही माहिती दिली आहे; परंतु प्रत्यक्षात परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा नसून तक्रारी दीड लाखाच्या घरात गेल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी सेवा म्हणून पीएमपी बससेवेची ओळख आहे. महिला, पुरुष, नोकरदार, विद्यार्थीं त्यासह ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेतात. दररोज सुमारे 10 लाख प्रवासी प्रवास करतात; या प्रवाशांना विविध समस्या उद्भवतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एसएमएस सेवा, व्हॉटस ॲप, फोन, ई-मेल, आणि संकेतस्थळ अशा विविध माध्यमातून तक्रारी नोंदविण्याच्या सुविधा देण्यात आलेल्या आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने मार्गांवर वेळेत बस न येणे, बस थांब्यावर न थांबवणे, बस वेगात पळविणे, मोबाईलवर बोलताना बस चालविणे, चालकांचे गैरवर्तन, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे इत्यादी तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. त्यामुळे तक्रारीची संख्या दीड लाखाच्या घरात गेली आहे. या तक्रारींचे निराकरण योग्य पध्दतीने होत नसल्यामुळे प्रत्यक्षात समस्या तशाच आहेत, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
..असे केले जाते तक्रारींचे निराकरण
पीएमपीच्या हेल्पलाईन कक्षात 12 कर्मचारी कार्यरत आहे. हेल्पलाईन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते. एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास कंट्रोल रुममधून ती तक्रार संबंधित आगाराकडे निराकरणासाठी पाठविली जाते. आगार स्तरावर तक्रारीचे निराकरण न झाल्यास ती तक्रार सहव्यवस्थापकीय संचालकांकडे पाठविली जाते. तेथेही तक्रारीचे निराकरण न झाल्यास पीएमपीचे अध्यक्ष यांनी तक्रारींचे निराकरण करणे अपेक्षित आहे.
विविध माध्यमातून आलेल्या तक्रारी
व्हॉट्स ॲप : 47 हजार 867
संकेतस्थळ : 29 हजार 401
ई-मेल आणि एसएमएस 30