

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 7) मुख्य व उपबाजार समिती बंद असल्याने पिंपरी व चिंचवड भाजी मंडई येथे भाज्यांची आवक कमी झाली. त्यामुळे भाज्यांचा तुडवडा झाला होता. भाजी मंडईमध्ये सर्व भाज्यांचे दर शंभरी पार होते. कांदे, बटाटे, टोमॅटो यांच्या दरात वाढ झाली होती. पालेभाज्यांचे दरदेखील वाढलेले होते.
शहराला भाजी पुरवठा करणार्या कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे मार्केट यार्ड येथील फळे, भाजीपाला, फुलांचा बाजार, खडकी उपबाजार, मोशी उपबाजार व मांजरी उपबाजार बंद दोन दिवस बंद होता. त्याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहरातील भाजी मंडई आणि किरकोळ भाजी विक्रेत्यांवर झाला. पितृपंधरावड्याला सुरुवात होत असल्याने नागरिकांना भाज्या मिळणे अवघड झाले होते. (Latest Pimpri News)
बाजारात गवारचा 200 रूपये किलो दर होेता. तोंडल्याची आवक कमी असल्याने 100 रूपये किलो भाव होता. पालेभाज्यांमध्ये इतर भाज्यांचे दरदेखील पाच ते दहा रूपयांनी वाढले होते. टोमॅटोचे दर वाढलेले असून 50-60 रूपये किलो दराने याची विक्री झाली.
कांदे आणि बटाटे यांचे भाव काही प्रमाणात वाढले होते. 20-25 रूपये किलो कांदे व बटाटे मिळत होते. फळभाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. कोथिंबीरची जुडी 25 रूपये तर पालेभाज्या 25-30 रूपये जुडी होत्या. तर, हिरवी मिरचीचा 80 रूपये किलो दर होता. तर फळभाज्यांमध्ये वांगी 100 रूपये किलो, दोडका 100 रूपये किलो, फ्लॉवर 60 - 70 रूपये किलो दर होता. यामध्ये लसूण 100-120 रूपये किलो तर आल्याचा 80 रूपये किलो दर होता.
फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे
रविवारी बाजारात गवार 200 रूपये किलो, शेवगा 100 रुपये किलो होता. वाटाणा 180 रूपये किलो, टोमॅटो 30, भेंडी 100, फ्लॉवर 60, कोबी 60, मिरची 80, गाजर 80, शिमला 80, लसूण 100-120, आले 80, वांगी 80, काकडी 60, कारले 80, कांदे 100, बटाटा 30, बिन्स 100, पावटा 100, रताळी 120, लाल भोपळा 60, घोसाळी 60, दोडका 80, तोंडली 100, बीट 50, दुधी 100, घेवड्याची 100 रुपये किलो दराने विक्री झाली.
पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे दर (रुपयांत) प्रतिजुडी
कोथिंबीर 25, मेथी 30, पालक 25, शेपू 25, पुदिना 15, मुळा 25, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 20, करडई 15, आळू पाने 10, आंबट चुका 20 रूपये.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रुपयांत)
बीट 80, वाल 100, दोडका 110, कारली 100, भरताची वांगी 60, गवार 220, शेवगा 120, भेंडी 80 ,मिरची 80, फ्लॉवर 70, कोबी 40, वांगी 100, तोंडली 120, घोसळे 70, पडवळ 120, दुधी भोपळा 100, पापडी 100, बीन्स 100 रूपये, परवल 50, रताळी 150 रूपये किलो, सुरण 80 रूपये, मद्रास काकडी 70 रूपये, आरबी 70 रूपये किलो, सिमला 100 रूपये, वाटाणा 150 रूपये, राजमा काळा100 , राजमा लाल 100, बिन्स 100 रूपये.
डाळींब आणि संत्र्याला मागणी
पिंपरी फळ बाजारात डाळींब आणि संत्री यांची आवक वाढली असून, अन्य फळांचे आवक कमी झाली होती. फळांचे दर 100 ते 150 रूपये किलो होेते. पेरूची आवक वाढली असून 100 रूपयांना दोन किलो दर होता.
बाजारात सफरचंद आणि डाळींबाचे दर कमी झाले होते. सफरचंद 200 रूपये दीड किलो दराने तर डाळींब शंभर रूपये दराने उपलब्ध होते. केळी 60 ते 70 रूपये डझन दर आहे. इतर फळांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. पावसामुळे फळांच्या मागणीतदेखील घट झाली आहे.
फळांचे दर प्रतिकिलो (रुपयांत) पुढीलप्रमाणे
देशी सफरचंद 200-250, मोसंबी 120, संत्री 160, डाळिंब 100, पेरू 50, पपई 60-70, अननस 120, केळी 70 रूपये डझन, अननस 100 प्रतिनग, पिअर 140, ड्रॅगनफ्रुट पांढरे 140, किवी 120, नाश्पती 120, आलुबुखार 150.