Pimpri Vegetable Rates: पिंपरीत भाज्यांचे दर कडाडले; आले ३०० रुपये किलो, कोबी-फ्लॉवरही महाग

पावसामुळे आवक घटल्याचा परिणाम; आठवडाभरात आल्याच्या दरात १०० ते १२० रुपयांची वाढ
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. १६) बाजारात आल्याचा भाव वधारला होता. आले ३०० रुपये प्रतिकिलो भाव झाला आहे. पावसामुळे आवक कमी झाल्याने आल्याच्या दराने झेप घेतली आहे. गेल्या आठवड्यात आल्याचा भाव १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री केली जात होते.

Vegetable
Lonavala Tourist Crowd: लोणावळा हाऊसफुल्ल! भुशी धरणावर पाय ठेवायलाही जागा नाही; पर्यटनस्थळांवर तुफान गर्दी

आठवडाभरात किलोमागे १०० ते १२० रुपये वाढ झाली आहे. कोबी आणि फ्लॉवर या भाज्या ४० ते ५० रूपये किलो दराने होत्या. त्या आज ८० ते १०० रूपये किलो दराने विक्रीस होत्या; मात्र पालेभाज्यांचे दर स्थिर होते. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू १५ - २० रुपये प्रति जुडी विक्री केली जात होती. रानभाज्यांमध्ये कर्टुलीची आणि घोळाच्या भाजी देखील क्वचित दिसत आहे.

Vegetable
Pimpri Chinchwad Police Accused Record: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवर आरोपींची ‘कुंडली’; आयरिसपासून डीएनएपर्यंत माहिती एका क्लिकवर

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

रविवारी बाजारात गवार ८० रुपये, शेवगा १०० रुपये, टोमॅटो ३०, भेंडी ६०, फ्लॉवर ८०, कोबी ७०, मिरची ६०, गाजर ४०, शिमला ६०, लसूण १८० ते २००, आले २८० - ३०० रुपये प्रतिकिलो. वांगी ४० रुपये, काकडी ३०, कारले ६०, कांदे २५ ते ३० रुपये किलो, बटाटा २५ ते ३०, बिन्स १००, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ४०, दोडका ६०, तोंडली ६०, बीट ४०, दुधी ५०, घेवडा १०० रुपये प्रतिकिलो विक्री केली जात आहे.

Vegetable
Pimpri Flyover Safety: पिंपरीतील फ्लायओव्हर धोक्याच्या छायेत; काँक्रीटच्या भिंतींना वड-पिंपळांचा विळखा

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी

कोथिंबीर १५ - २० रुपये, मेथी २०, पालक २०, शेपू २०, राजगिरा २०, पुदिना १५, मुळा २५ रुपये, चवळई १५, लाल माठ १५, करडई २०, कांदापात २०, करडई १५, आळू पाने १० रुपये जुडी, आंबट चुका १५ रुपये.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा १२० रुपये, गवार १००, पावटा ८० - ९०, तोंडली ८०, बीट ४० - ५०, दोडका ७०, कारली ७० , भरताची वांगी ५०, भेंडी ७०, मिरची ७०, फ्लॉवर १००, कोबी १००, वांगी ५०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ५०, पापडी ९०, पावटा १००, सुरण ९०, मद्रास काकडी ३०, राजमा १०० - १२०, बिन्स १००, गाजर ६०, टोमॅटो ४० रुपये प्रतिकिलोचा दर आहे.

Vegetable
Pimpri Chinchwad Police Headquarters: पिंपरी-चिंचवड पोलिसांना अखेर हक्काची जागा; ताथवडेत ५० एकरांत अत्याधुनिक पोलिस संकुल

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा २०, बटाटा १०, लसूण १००, आले ६० , भेंडी २५, गवार ४५, टोमॅटो १५, वाटाणा १२५, घेवडा ४५, दोडका ३०, हिरवी मिरची ३५, दुधी भोपळा २०, काकडी १५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर ७५, कोबी ६०, ढोबळी २५, वांगी ३०, शेवगा ४५, घोसाळी ३०, लिंबू २५, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ५७०९, पालेभाजी ५१५०० (गड्डी), फळे आवक ५६४, कांदा ९९०, बटाटा १५७६, लसूण २९, आले ५०, भेंडी २३०, गवार २१, टोमॅटो ८३५, वाटाणा १०, घेवडा ३५, दोडका ६५, हिरवी मिरची २२८, दुधी भोपळा ९९, काकडी १६२, कारली ७६, डांगर ११६, गाजर ७७, फ्लॉवर १७९, कोबी २४६, वांगी १७०, ढोबळी १३०, बीट १९, शेवगा ६४, लिंबू ७५, मका कणीस ११६ इतकी आवक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news