Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीत टोमॅटो १५ रुपये किलो; लसूण २५० रुपयांवर, कांदा आणि लिंबाचे दरही तेजीत

लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत आवक वाढल्याने टोमॅटोचे दर घसरले; दिवाळीमुळे ग्राहकांची गर्दी कमी, मोशी उपबाजारातही भाजीपाल्याचे दर तुलनेने कमी
Garlic
GarlicPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. ९) आवक जास्त झाल्याने टोमॅटो १५ ते २० आणि दुधी भोपळा, लाल भोपळ्याचा किलोचा दर २० ते २५ रुपये होता, तर इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर होते.

Garlic
Pimpri Chinchwad Municipal Corporation Loan: पिंपरी-चिंचवड महापालिकेवर १,७४६ कोटींच्या कर्जाचा डोंगर; आर्थिक गणित बिघडण्याची भीती

बाजारात लसणाच्या दरात वाढ कायम असून याचा २०० ते २५० रुपये किलो दर आहे. आलेदेखील १२० ते १५० रुपये किलो होते. हिरव्या मिरचीची ६० रुपये किलो दराने विक्री झाली. दिवाळी सणामुळे सध्या भाजी मंडईमध्ये ग्राहक कमी असल्याने भाजीची आवकदेखील कमी होती. कांद्याचे दर तेजीतच होते.

Garlic
Talegaon Dabhade Diwali Bonus: तळेगाव दाभाडेतील २७५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ८.३३ टक्के बोनस जमा

लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो दराने होते. कांदे ५० ते ६० रुपये, गाजर ४० ते ५० रुपये, बीट ४० रुपये, वाटाणा १५० ते १६० रूपये, बीन्स ४० ते ६० रुपये, राजमा ७० रूपये, वांगी ६० रुपये, गवार ८० ते १०० रुपये, शेवगा ६० ते ८० रुपये, दोडका ६० ते ७० रुपये, कोबी ४० रुपये, फ्लॉवर ५० रुपये, काकडी ३० ते ४० रुपये, टोमॅटो १५ रुपये, शिमला ४० ते ५० रुपये, मिरची ५० ते ६० रुपये, तोंडली ५० ते ६० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये तोंडले ५० ते ६० रुपये किलो होते.

Garlic
Children Selling Brooms During Diwali: दिवाळीच्या झगमगाटात चिमुकल्यांच्या हातात केरसुणी; बालपण हरवल्याचे वास्तव

फळभाज्यांचे किलोच दर पुढील प्रमाणे (रुपयात)

रविवारी बाजारात गवार ८० रुपये किलो, गावरान गवार १५०, शेवगा ८०, वाटाणा १००-१५०, टोमॅटो १५, भेंडी ५०, फ्लॉवर ५०, कोबी ४०, मिरची ५०, गाजर ४०, शिमला ६०, लसूण २००, आले १५०, वांगी ५०, काकडी ३०, कारले ५०, कांदे ६०-८०, बटाटा २५-३०, बिन्स ७०, पावटा ८०, लाल भोपळा २०, घोसाळी ४०, दोडका ४०, तोंडली ५०, बीट ४०, दुधी भोपळा २५.

पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे प्रति जुडी दर (रुपयात)

कोथिंबीर २०-२५, मेथी २०-२५, पालक २०, शेपू २०, राजगिरा २०, पुदिना १५, मुळा २५, चवळई १५, लाल माठ ३०, हिरवा माठ ३०, करडई १५, कांदापात २०, करडई १५, आळू पाने २०, आंबट चुका २०, अंगाडी १५, गवती चहा १०, लाल देठ ३०-४०.

Garlic
Pimpri Chinchwad Diwali Fire Safety: दिवाळीत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये २५० अग्निशमन कर्मचारी तैनात

किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे किलोचे भाव (रुपयात)

शेवगा १००, वाटाणा १४०-१५०, गावरान गवार १५०, गवार ९०, पावटा ८०, तोंडली ६०, बीट ५०, दोडका ६०, कारली ६०, भरताची वांगी ५०, भेंडी ७०, मिरची ७०, फ्लॉवर ५०, कोबी ४०, वांगी ५०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३०, पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९०, मद्रास काकडी ५०, आरबी ८०, सिमला ६०, राजमा १००, बिन्स ७०, गाजर ५०, आरवी ८०, रताळी ५०, टोमॅटो २०.

मोशी उपबाजारातील फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयात)

कांदा ३०, बटाटा १२, लसूण १००, आले ६०, भेंडी ४०, गवार ७०, टोमॅटो ७, वाटाणा ९०, घेवडा ७०, दोडका ३०, हिरवी मिरची ३०, दुधी भोपळा १५, काकडी २५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर २०, कोबी १०, ढोबळी ४०, वांगी २५, शेवगा ५०, घोसाळी २५, लिंबू ७०, मका कणीस १००.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटलमध्ये )

फळभाजी २०९६, पालेभाजी ३८८०० (गड्डी), फळे आवक ३३०. कांदा २८१, बटाटा ५४३, लसूण ५, आले २७, भेंडी ५०, गवार ९, टोमॅटो २७३, वाटाणा १०, घेवडा १५, दोडका ५, हिरवी मिरची ६३, दुधी भोपळा ५३, काकडी ६५, कारली १८, डांगर ३५, गाजर ४३, फ्लॉवर २२१, कोबी १५४, वांगी ५९, ढोबळी ३३, बीट २१, शेवगा १४, लिंबू २४, मका कणीस २७, तोंडली २.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.