Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिर; कोथिंबीर 30 रुपये जुडी, गवार-शेवगा महागच

लालबहादूर शास्त्री मंडईत आवक कायम; भेंडी 80, वांगी 60 रुपये किलो, मोशी उपबाजारात हजारो क्विंटल भाजीपाल्याची आवक
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शासाजी मंडईत रविवार (दि. २६) बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक झाली आहे; मात्र गेल्या आठवड्यानुसार दर स्थिरचे आहेत. कोथिंबीरची जुडी २० ते ३० रुपये विक्री केली जात आहे. तर भेंडी ८० रुपये व वांगी ६० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

Vegetable
Pimpri Chinchwad Waterlogging: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाळापूर्व तयारीचा दावा फोल? रस्ते, बसथांबे पाण्याखाली; नागरिकांची गैरसोय

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

रविवारी बाजारात गवार १२० रुपये, शेवगा १०० रुपये किलो विक्री केली जात आहे. टोमॅटो ३०, भेंडी ७०, फ्लॉवर ७०, कोबी ३०, मिरची ६०, गाजर ४०, शिमला ७०, लसूण १८० - २००, आले १२० - १४०, वांगी ६०, काकडी ३०, कारले ७०, कांदे २५ - ३०, बटाटा २५ - ३०, बिन्स १००, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ५०, दोडका ८०, तोंडली ७०, बीट ४०, दुधी ५०, घेवडा १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Pimpri Chinchwad Mule Account Fraud: पंधरा दिवसांत ६० जणांवर म्युल अकाउंटचे गुन्हे; काही हजारांच्या आमिषाने नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात

पिंपरी बाजारातील दर :

पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी

कोथिंबीर ३० रुपये, मेथी ३०, पालक 3०, शेपू ३०, राजगिरा २०, पुदिना २५, मुळा ३०, चवळई २०, लाल माठ २०, हिरवा माठ २०, करडई २०, कांदापात ३०, करडई २०, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका २० रुपये प्रति जुडी विक्री केली जात आहे.

Vegetable
PCMC Waste Processing Centres: पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा व्यवस्थापनाला नवा वेग; १० क्षेत्रीय कार्यालयांत अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रांची तयारी

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा १२० रुपये, गवार १४०, पावटा ८० - १००, तोंडली १००, बीट ४० - ५० , दोडका ९०, कारली ८० , भरताची वांगी ६० - ७०, भेंडी ८० रूपये, मिरची ७०, फ्लॉवर ८०, कोबी ५०, वांगी ७०, घोसाळे ६०, पडवळ ९०, दुधी भोपळा ६०, पापडी १००, पावटा १००, परवल १००, सुरण ९०, मद्रास काकडी ३०, आरबी 80, सिमला ९० रुपये, राजमा १०० - १३०, बिन्स १२०, गाजर ५० रुपये, रताळी ६० रुपये, तर टोमॅटो ४० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री जात आहे.

Vegetable
Lonavala Flood Damage: लोणावळा पूरप्रकरण तापले; १९०० कुटुंबांच्या नुकसानीवरून टाटा कंपनीविरोधात २८ जुलैला मोर्चा

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा १३, बटाटा ११, लसूण ०, आले ९० , भेंडी ३५, गवार ४५, टोमॅटो १५, वाटाणा १५०, घेवडा १३५, दोडका ३५, हिरवी मिरची ५५, दुधी भोपळा २५, काकडी १५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर २०, कोबी १५, ढोबळी ४०, वांगी २५, शेवगा ५५, घोसाळी ३५, लिंबू २५, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ४०८९, पालेभाजी ४१७०० (गड्डी), फळे आवक ३००, कांदा ५४२ , बटाटा १०१०, लसूण ०, आले ४०, , भेंडी ३३, गवार २१, टोमॅटो ६२०, वाटाणा ६, घेवडा २७, दोडका ५३, हिरवी मिरची १८४, दुधी भोपळा ४३, काकडी २०१, कारली ५९, डांगर ६१, गाजर ९४, फ्लॉवर २०४, कोबी १९९, वांगी २०५, ढोबळी ७७, बीट २८, शेवगा ६०, लिंबू ९५, मका कणीस १२२, तोंडली १५, रताळी ० क्विंटल इतकी आवाक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news