

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 29) बाजारात शेवग्याची आवक जास्त झाल्यामुळे शेवग्याचे दर कमी झाले होते. गेल्या आठवड्यात 100 रूपये किलो दराने मिळणारा शेवगा 40 रूपये किलो दराने विक्रीस होता. बिन्स आणि मटारची आवक कमी झाल्यामुळे दर वाढले होते. बिन्स आणि मटार 100 रुपये किलो, मिरची 80 रूपये किलोने विक्री केली जात आहे.
कर्नाटक कैरी बाजारात 50 - 60 रूपये किलो दराने विक्रीस उपलब्ध होती. कराड येथील रताळी बाजारात दाखल झाली असून 60 रूपये किलो दर होता. लिंबू 120 रूपये किलो दराने विक्री केले जात आहे. कोबी 30 , फ्लॉवर 40 रूपये, वांगी 40, कारली 60 ,दोडका 60 रुपये, लाल भोपळा 40, बीट 30 , गाजर 40, कर्नाटक कैरी 50 - 60, शेवगा 40, गवार 100, लसूण 100 - 150, आले 60 - 70, दुधी भोपळा 40, कराड रताळी 60, सिमला 60 - 70 रूपये किलो दराने विक्री केली जात आहे.
फळभाज्यांचे दर खालीलप्रमाणे
रविवारी बाजारात गवार 80 - 100 रूपये किलो, शेवगा 40, मटार 90, टोमॅटो 20, भेंडी 60, फ्लॉवर 30, कोबी 25, मिरची 80 - 100, गाजर 30, शिमला 50, लसूण 100 - 120 रूपये, आले 50, वांगी 40, काकडी 20, कारले 50, कांदे 20 - 25 किलो, बटाटा 25- 30, बिन्स 70, पावटा 70, भोपळा 30, दोडका 70, तोंडली 70, बीट 30, दुधी 40, घेवडा 60 रूपये किलो असे दर होते.
पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी
कोथिंबीर 15 - 20 रूपये, मेथी 20 - 25 रूपये, पालक 15 - 20, शेपू 10 - 15, राजगिरा 20, पुदिना 10, मुळा 20, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 15 - 20, करडई 20, आळू पाने 10 रूपयांना जुडी, चुका 20, गवती चहा 10 रूपये असे दर आहेत.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा 50 रूपये, गवार 120 रूपये , पावटा 80, तोंडली 80 रूपये, वाटाणा 100 रूपये, बीट 50, दोडका 60, कारली 70, भरताची वांगी 50, भेंडी 80 रूपये, मिरची 80 - 100, फ्लॉवर 40, कोबी 30, वांगी 50, घोसळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 50, पापडी 60, सुरण 80 रुपये, मद्रास काकडी 40 रूपये, आरबी 50 रुपये किलो, सिमला 60 - 70 रूपये, राजमा 70, बिन्स 90 रूपये , गाजर 50 रूपये किलो, रताळी 60 रूपये, टोमॅटो 30 रूपये , काकडी 50 रूपये किलो दराने विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रूपयांत)
कांदा 8, बटाटा 11, लसूण 65, आले 25, भेंडी 30, गवार 40, टोमॅटो 8, वाटाणा 40, घेवडा 40, दोडका 30, हिरवी मिरची 45, दुधी भोपळा 15, काकडी 15, कारली 20, गाजर 25, फ्लॉवर 10, कोबी 10, वांगी 15, बीट 25, शेवगा 45, घोसाळी 30, लिंबू 100, शिमला 30, परवल 0, मका कणीस 50 रूपये प्रतिकिलो असे दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 4480, पालेभाजी 56100 (गड्डी), फळे आवक 2290, कांदा 800, बटाटा 545, आले 57, लसूण 18, भेंडी 185, टोमॅटो 685, मटार 52, घेवडा 45, दोडका 54, हिरवी मिरची 174, दुधी भोपळा 91, काकडी 313, कारली 31, गाजर 145, फ्लॉवर 329, कोबी 313, वांगी 200, ढोबळी 57, शेवगा 78, लिंबू 46, मका कणीस 30, तोंडली 10, रताळी 17 क्विंटल इतकी आवक झाली आहे.