Pimpri Podar School Gate Accident: ताथवडे पोदार शाळेतील लोखंडी गेट कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बससाठी गेट उघडताना घडली दुर्घटना; निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
School
SchoolPudhari
Published on
Updated on

पिंपरी: ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल शाळेच्या प्रवेशद्वारावरील जड लोखंडी स्लायडिंग गेट अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा २ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३१ जुलै रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

School
Pimpri Chinchwad Highway Accidents: पिंपरी-चिंचवडमधील चार महामार्ग ठरताहेत मृत्यूचे सापळे; अडीच वर्षांत 355 जणांचा बळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेची बस आवारात येत असल्याने सुरक्षारक्षक गेट उघडत होते. त्याच वेळी जड स्लायडिंग गेट अचानक रुळावरून निखळून त्यांच्या अंगावर कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची वाकड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

School
Lonavala Car Accident Rescue: निसर्गदृश्य पाहण्याचा मोह पडला महागात; लोणावळ्यात ५० फूट दरीत कोसळली कार, पोलिसांनी वाचवला चालकाचा जीव

कारवाईची मागणी

या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधासह लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे. चौकशीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.

School
PCMC MIDC Robbery Case: एमआयडीसीतील परराज्यातील कामगारांना लुटणारी टोळी गजाआड; तीन गुन्ह्यांची उकल

पालकांमध्ये चिंता

या दुर्घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांची दररोज मोठ्या प्रमाणावर ये-जा असलेल्या प्रवेशद्वारावरील जड लोखंडी गेटची नियमित तपासणी झाली होती का, त्याची देखभाल वेळोवेळी करण्यात आली होती का, तसेच सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) करण्यात आले होते का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

School
PCMC Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार पडताळणीला वेग; चार दिवसांत २३ टक्के मतदारांची नोंदणी पूर्ण करण्याचे आव्हान

मोठी दुर्घटना टळली

ही घटना शाळेच्या वेळेत आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घडली असती, तर त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे शाळांमधील प्रवेशद्वारे, खेळणी, जिने आणि इतर सुरक्षाविषयक बाबींची नियमित तपासणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

शाळेची बस आल्यानंतर गेट उघडत असताना ही दुर्घटना घडली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या सर्व बाबींची चौकशी सुरू असून, चौकशी अहवालानुसार पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल.

विठ्ठल साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news