Pimpri Sai Chowk Road: पिंपरी साई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडाची फांदी लोंबकळते; अपघाताचा धोका

वाहनांच्या मार्गातच आली फांदी; महापालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने छाटणी करण्याची मागणी
Pimpri Tree Falling
Pimpri Tree FallingPudhari
Published on
Updated on

खराळवाडी: पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी साई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडाची मोठी फांदी लोंबकळत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही फांदी वाहनांच्या मार्गात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, दुचाकीस्वार तसेच मोठ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

Pimpri Tree Falling
Kasarwadi BRTS Footpath: कासारवाडी बीआरटीएसकडे जाणारा पदपथ खड्ड्यात; पेव्हिंग ब्लॉक उखडले, खडी-माती-कचऱ्याचा विळखा

प्रशासनाचे दुर्लक्ष

या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच रस्त्याच्या दिशेने लोंबकळणारी फांदी वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास वाहनाला धडकण्याची अथवा दुचाकीस्वाराचा तोल जाण्याची शक्यता आहे. रात्रीच्यावेळी प्रकाश कमी असल्याने या या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी शहरातील रस्त्यांवर झाडांच्या धोकादायक फांद्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होण्याच्या घटना यापूर्वीही निदर्शनास आल्या आहेत.

Pimpri Tree Falling
Pimple Gurav Wall Collapse: पिंपळे गुरवमध्ये जीर्ण संरक्षक भिंत कोसळली; अरुंद बोळीत दगड-मातीचा ढिगारा, दुर्घटनेचा धोका

महामार्गालगतच्या या रस्त्यावर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्यावर आलेली फांदी छाटावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Pimpri Tree Falling
Maymer Hospital Pregnant Woman Death: गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; सिझेरियननंतर बाळाचाही मृत्यू, नातेवाईकांचा हलगर्जीपणाचा आरोप

फांद्या हटविण्याची मागणी

रस्त्यावर आडवी आलेली फांदी तातडीने छाटून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने विलंब न करता कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news