Pimpri Rain: जोरदार पावसामुळे रस्त्यांची दैना; खड्डे बुजविल्याचा पालिकेचा दावा फोल

उपनगरातील रस्त्यांची चाळण
Pimpri Rain
जोरदार पावसामुळे रस्त्यांची दैना; खड्डे बुजविल्याचा पालिकेचा दावा फोलPudhari
Published on
Updated on

PMC Pothole

पिंपरी: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार पावसामुळे शहर परिसरातील सखल भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, तर उपनगरातील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रविवार (दि. 6) खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे मोठी तारांबळ उडाली.

पुणे वेधशाळेने जिल्हा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच काही भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील घाट भागामध्ये मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. (Latest Pimpri News)

Pimpri Rain
Pimpri News: उच्च शिक्षणानंतरही नोकरी न मिळाल्याने अभियंता तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

रविवारी सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यावर पाणीच पाणी झाले. चिंचवडमध्ये 20 मिली मीटर, लवळे 4.5 तर, दापोडी 0.5 मिली मीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

यंदा मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यात पहिल्या पंधरवाड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांची मोठी चाळण झाली. रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. निगडी ते चिंचवड दरम्यान मेट्रोचे काम सुरु असल्याचे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. रस्ता अरूंद झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहन चालकांना येथून मार्ग काढताना मोठे त्रासाचे ठरत आहे. खासगी ट्रॅव्हल्स गाड्या रस्त्यातच उभ्या केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

Pimpri Rain
Pimpri News: डीपीबाबत तब्बल 19 हजार हरकती

503 खड्डे बुजविणे बाकी

महापालिकेच्या प्रशासनाच्या दाव्यानूसार 1444 खड्डे होते. मागील आठवड्यात 178 नव्या खड्ड्याची नोंद झाली. त्यानूसार शहरात 1622 खड्डे पडलेले आहेत. त्यात महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने 539, खडीने 33, पेव्हिंग ब्लॉकने 441, सिमेंट काँक्रिटने 106 असे 1119 खड्डे पूर्ण बुजविले आहेत. शहराच्या विविध भागांतील 503 खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

रस्त्यांची पुरती वाट

पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविणे गरजेचे होते; मात्र पालिका प्रशासनाने खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसात 200 खड्डे आढळले आले आहेत. शहरातील 1622 खड्ड्यापैकी 1119 खड्डे बुजविल्याचे प्रशासनाने दावा केला असून आणखी 503 खड्डे अद्याप बुजविले गेले नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान याबाबत प्रशासनाकडून काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसात 178 खड्डे आढळले.

औद्योगिक परिसरात चाळण

शहरातील भोसरी एमआयडीसी, चिखली, जाधववाडी, देहू रस्ता, चिंचवड, निगडीसह काही भागांतील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या ठिकाणी अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे येथील उद्योजकाकडून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खड्ड्यांतून बारीक खडी रस्त्यावर इतस्तत: पसरत असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. परिणामी दररोज वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्रासदायक प्रवासामुळे शहरवासीय पुरते वैतागले आहेत.

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तत्काळ मुरूम, खडी आणि सिमेंट काँक्रिट बुजविले जातात. खडड्डे बुजविणे कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. स्थापत्यच्या अधिकार्‍यांना शहर खड्डेमुक्त करण्यास सांगितले आहे.

- मकरंद निकम, शहर अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news