Pimpri Cockroach Janata Party: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’ पोस्टरमुळे खळबळ; प्रशासनावर प्रश्न

रावेत परिसरात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या पोस्टर मोहिमेमुळे अनधिकृत भाडेकरू, सुरक्षा प्रश्न आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर चर्चा
Pimpri Cockroach Janata Party
Pimpri Cockroach Janata PartyPudhari
Published on
Updated on

पिंपरी: देशभरात चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीची आता पिंपरी-चिंचवड शहरामध्येही एंट्री झाल्याने शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. रावेत परिसरात झळकलेल्या आक्रमक पोस्टर मोहिमेमुळे अनधिकृत भाडेकरू, हाऊसिंग सोसायट्यांमधील सुरक्षा प्रश्न व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांमध्येही याबाबत मत-मतांतरे उमटत आहेत.

Pimpri Cockroach Janata Party
Pimpri Illegal Posters DP Box: पिंपळे गुरवमध्ये डीपी बॉक्सवर बेकायदा पोस्टर्सचा सुळसुळाट; धोका वाढला

रावेतमधील अनधिकृत भाडेकरूंना पोलिसांचे अभय? असा थेट सवाल पोस्टरमधून करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, हाऊसिंग सोसायटी पदाधिकारी व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोस्टरमध्ये कॉकरोचचे प्रतीक वापरत जनतेचा आवाज, असा संदेश देण्यात आला आहे. हातात माईक व व्यवस्थेकडे बोट दाखवणारा कार्टून कॅरेक्टर वापरून थेट प्रशासनावर निशाणा साधण्यात आला आहे.

Pimpri Cockroach Janata Party
Bhosari Sahal Kendra Condition: भोसरी सहल केंद्राची दुरवस्था; झुकझुक गाडी बंद, खेळण्यांची पडझड

अनधिकृत भाडेकरूंमुळे सुरक्षेचे प्रश्न गंभीर

पोस्टरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अनधिकृत भाडेकरूंमुळे अनेक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये गर्दी, पार्किंगचा गोंधळ, पाणी-वीज वापरावर अतिरिक्त ताण, वाढते मेंटेनन्स खर्च व सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. भाडेकरू कोण आहेत?, त्यांची पार्श्वभूमी काय?, पोलिस व्हेरिफिकेशन झाले आहे का?, असे सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तक्रार करूनही कारवाई होत नाही, उलट तक्रारदारांनाच सुनावले जाते, अशी ओळ पोस्टरमध्ये झळकली असून, ती सर्वांधिक चर्चेत आली आहे. अनेक सोसायटी पदाधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना भाडेकरूंच्या पोलिस पडताळणीबाबत प्रशासन उदासीन असल्याची भावना व्यक्त केली.

Pimpri Cockroach Janata Party
Pimpri School Bus Fare Hike: पिंपरीत स्कूल बस भाड्यात 30 ते 40 टक्के वाढीची शक्यता

आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचे नागरिकांना आवाहन

पोस्टरमध्ये रावेत बदलेल, व्यवस्था सुधरेल अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच, नागरिकांना एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ सोशल मीडिया ट्रेंड न राहता आगामी काळात स्थानिक राजकारणातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कॉकरोच जनता पार्टीची ही पोस्टर मोहीम रावेतसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चेचा विषय बनली असून, प्रशासन याची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pimpri Cockroach Janata Party
Pimpri Chinchwad Smart City: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी बंदीचा गोंधळ कायम; निर्णय आयुक्तांच्या हाती

प्रमुख मागण्या

अनधिकृत भाडेकरूंवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, हाऊसिंग सोसायटीधारकांना पोलिसांचे सहकार्य व संरक्षण द्यावे, सोसायट्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात, थकबाकीदार भाडेकरू आणि मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, भाडेकरू नोंदणी व पोलिस व्हेरिफिकेशनसाठी स्पष्ट धोरण लागू करावे, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.

संतप्त नागरिकांचा प्रतीकात्मक आवाज

पोस्टरची भाषा, डिझाइन आणि संदेश अत्यंत आक्रमक असल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. काहींनी या मोहिमेला जनतेचा दबलेला आवाज म्हटले आहे. तर, काहींनी हा प्रकार विशिष्ट वर्गाला लक्ष्य करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले आहे. रावेत, ताथवडे, पुनावळे, वाकड व हिंजवडीसारख्या आयटी पार्कलगतच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाडेकरू वास्तव्यास असल्याने हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे. त्यामुळे या पोस्टर मोहिमेमागे एखादा सामाजिक गट आहे की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय जमीन तयार करण्याचा प्रयत्न, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news