Pimpri Ramaai Ambedkar Memorial: पिंपरीत माता रमाई आंबेडकर स्मारक; 28 एप्रिलला भूमिपूजन

भीमसृष्टी परिसरात 19.36 कोटींचा प्रकल्प; दोन वर्षांत उभारणार स्मारक
Pimpri Ramaai Ambedkar Memorial
Pimpri Ramaai Ambedkar MemorialPudhari
Published on
Updated on

पिंपरी: सामाजिक समतेचा प्रेरणादायी वारसा जपणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (भीमसृष्टी) परिसराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत उभारण्यात येणार आहे.

Pimpri Ramaai Ambedkar Memorial
Pimpri Chinchwad Senior Citizens Safety: ज्येष्ठ नागरिक छळावर कडक कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा इशारा

त्याचे भूमिपूजन येत्या मंगळवारी (दि.28) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी (दि.24) दिली.

Pimpri Ramaai Ambedkar Memorial
Pimpri Smart City Company Closed: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी बंद; राज्य शासनाचे आदेश

महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेला उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, धर्मपाल तंतरपाळे, डॉ. सुहास कांबळे, सहशहर अभियंता मनोज सेठिया आदी उपस्थित होते.

Pimpri Ramaai Ambedkar Memorial
Pimpri Power Outage Crane Incident: तळवड्यात क्रेन रोहित्रावर कोसळली; 8,600 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

महापौर लांडगे म्हणाले की, आंबेडकरी जनतेची मागणी होती की, पिंपरी चौकातील भीमसृष्टीशेजारील मोकळ्या जागेत माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारावा. त्या मागणीनुसार तेथील जागेचे आरक्षण बदलण्यात आले. माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या खर्चास स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. येत्या मंगळवारी त्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येत आहे.

Pimpri Ramaai Ambedkar Memorial
Talegaon Water Supply Summer Demand: तळेगाव दाभाडेत पाण्याची मागणी वाढली; नागरिकांना जपून वापराचे आवाहन

दरम्यान, माता रमाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणे, माता रमाई सृष्टी आणि विद्युत सुशोभिकरण, उद्यान आदींसाठी एकूण 19 कोटी 36 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चाला स्थायी समितीने बुधवारी (दि.23) मंजुरी दिली आहे. ते स्मारक दोन वर्षांत बांधण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news