Pimpri MNGL Plumber Jobs: पिंपरीत MNGL गॅस पाइपलाइनसाठी प्लंबर भरती; 70 हजारांपर्यंत उत्पन्नाची संधी

एमएनजीएलच्या घरगुती गॅस पाइपलाइन प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड आयटीआयमधून प्रशिक्षित प्लंबर निवडले जाणार असून महिन्याला 70 हजारांपेक्षा जास्त कमाईची संधी
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीच्या वतीने शहरातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांना घरगुती गॅस पाइपलाइनची जोडणी केली जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या प्लंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवड झालेल्या प्लंबरला महिन्यास 70 हजारांपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Cockroach Janata Party: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’ पोस्टरमुळे खळबळ; प्रशासनावर प्रश्न

प्लंबरसाठी महापालिकेच्या मोरवाडी आयटीआयमध्ये भरती मेळावा घेण्यात आला. त्यात एमएनजीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक वासुदेव गुरसाळी यांनी कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. इच्छुक प्लंबर्सना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Illegal Posters DP Box: पिंपळे गुरवमध्ये डीपी बॉक्सवर बेकायदा पोस्टर्सचा सुळसुळाट; धोका वाढला

त्यांना साईटवर प्रत्यक्ष काम शिकवले जाणार आहे. भविष्यात सीजीडी कंपन्यांमध्ये प्लंबर्सची मागणी झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. निवडलेले प्लंबर्स हे एमएनजीएलचे अधिकृत व्हेंडर्सअंतर्गत काम करतील.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Bhosari Sahal Kendra Condition: भोसरी सहल केंद्राची दुरवस्था; झुकझुक गाडी बंद, खेळण्यांची पडझड

त्यांच्या कामाच्या कार्यक्षेत्रामध्ये एमसीव्हीटू इंस्टॉलेशन, मीटर इंस्टॉलेशन, कॉपर पाईपिंग आणि किचन कन्वर्जनचे काम समाविष्ट आहे. जॉब वर्कनुसार महिन्याला साधारण 70 हजारांपेक्षा जास्त रुपयांची कमाई होईल. एमएनजीएलचे उपप्रबंधक ओम उगले व अमोल वैद्य यांनीही मार्गदर्शन केले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri School Bus Fare Hike: पिंपरीत स्कूल बस भाड्यात 30 ते 40 टक्के वाढीची शक्यता

मेळाव्यात 40 ते 50 प्लंबर विद्यार्थ्यांनी त्या कामास तयारी दर्शवली. ती संख्या अजून वाढणार आहे. अजून प्लंबर्स इच्छुक असतील तर त्यांनी आयटीआयला संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले आहे. या वेळी गटनिदेशक शर्मिला काराबळे, रवी ओव्हाळ, निदेशक किसन गावडे, विक्रम काळोखे, विशाल रेंगडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news