Pimpri MIDC Drainage Encroachment: पिंपरी एमआयडीसीतील नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश

नैसर्गिक जलप्रवाह बाधित; पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे निर्देश
Natural Water Source
Natural Water SourcePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील तसेस, एमआयडीसी परिसरातील नैसर्गिक नाल्यांवर झालेले अतिक्रमण तसेच, बुजविण्याच्या प्रकारांमुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचते. अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण तात्काळ हटवून, नाले उघडे करावे, असे आदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Natural Water Source
Pimpri Traffic Warden Chain Snatching: पिंपरीत माजी ट्रॅफिक वॉर्डन अटकेत; दुचाकी चोरीतून चेन स्नॅचिंग

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी शहरातील तसेच, एमआयडीसी परिसरातील नाल्यांची सद्यस्थिती, त्यावरील अतिक्रमणे तसेच, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतावाड, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान एमआयडीसी परिसरातील ड्रेनेजलाईन व्यवस्थेचे सध्याचे स्वरूप, अडथळे व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली.

Natural Water Source
Gas Booking Cyber Fraud: गॅस बुकिंगच्या नावाखाली सायबर फसवणूक; पिंपरीत नागरिकांना इशारा

आयुक्त म्हणाले की, शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या नकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आले आहेत. त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहेत. अतिक्रमणांमुळे पावसाळ्यात नैसर्गिक जलप्रवाह अडथळा निर्माण होतो. पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि उद्योग व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. असे प्रकार दरवर्षी पावसाळ्यात घडत आहेत. त्यामुळे उद्योजक हैराण झाले आहेत.

Natural Water Source
Pimpri Bhimsrushti Ambedkar Jayanti Celebration: पिंपरीतील भीमसृष्टीत भीमजयंतीला जनसागर; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

त्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून एमआयडीसी परिसरातील बुजविलेले किंवा अतिक्रण झालेले नाले तसेच, पाणी साचणारी ठिकाणे तात्काळ नोंद घ्यावी. जुन्या नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घ्यावे. ज्या ठिकाणी ते शक्य नाही तेथे पर्यायी स्वरूपात स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

Natural Water Source
PMRDA Housing Record: पीएमआरडीएचा विक्रम; 95 दिवसांत 14 मजली इमारत पूर्ण

एमआयडीसीत परस्पर जागांची विक्री

एमआयडीसीत अनेक जागा रिकाम्या आहेत. काही जागा महापालिकेस नागरी सेवा-सुविधांसाठी एमआयडीसीकडून देण्यात आल्या आहेत. त्या जागांचे सपाटीकरण करुन त्या जागांची परस्पर विक्री तसेच, भाड्याने देण्याचे प्रकार एमआयडीसी भागात जोरात सुरू आहेत. त्यातच नैसर्गिक नाले बुजवून त्या जागा भाड्याने देण्याचे प्रकारही समोर आले आहे. या प्रकाराची टोळ्या एमआयडीस कार्यरत आहेत. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news