Pune Metro Service: पुणे, पिंपरी- चिंचवडकरांना स्वातंत्र्यदिनाची भेट; शुक्रवारपासून दर सहा मिनिटांनी धावणार मेट्रो

Pune Metro Service Independence Day: विनागर्दीच्या वेळी मात्र दर 10 मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

Pune Metro frequency during peak hours

पिंपरी: सध्या सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 8 या गर्दीच्या वेळेत दर 7 मिनिटाला मेट्रो धावत होती. आता गुरुवार (दि. 15) पासून मेट्रो गर्दीच्या वेळेस दर 6 मिनिटाला धावणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. विनागर्दीच्या वेळी मात्र दर 10 मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.

सद्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून 490 फेर्‍यांव्दारे मेट्रोसेवा पुरवत आहे. दर 6 मिनिटाला ट्रेन सेवा यामुळे अधिक 64 फेर्‍या वाढणार आहे. पंधरा ऑगस्टपासून एकूण फेर्‍या 554 वाढणार आहे. अधिकच्या 64 फेर्‍यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. (Latest Pimpri News)

Pune Metro
Khed Accident: खेड अपघातप्रकरणी टेम्पोचालकाला अटक

दर 6 मिनिटाला ट्रेन चालवण्यास मेट्रो दोन महिन्यापासून प्रयत्नशिल होती. त्या अनुषंगाने अनेकवेळा चाचण्या घेण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर 15 ऑगस्टपासून दर 6 मिनिटाला सेवा हा निर्णय घेण्यात आला आहे.

जुलै महिन्यामध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या 1 लाख 92 हजारपर्यंत वाढली. ऑगस्टमध्ये प्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. आजपर्यंत प्रवाशांची सरासरी संख्या 2लाख 13 हजार 620 निदर्शनास आली आहे. पिंपरी मेट्रो स्टेशनवर प्रवासी संख्या विक्रमी आहे. त्यामुळे महामेट्रोस सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे.

Pune Metro
Pimpri Firing: पिंपरीत गोळीबार करणारा निघाला रवी पुजारी गॅंगचा शूटर; बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट, सहा वेळा गोळीबार

याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, मेट्रोच्या प्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मेट्रोने दैनंदिन मेट्रोच्या फेर्‍यांमध्ये वाढ केली आहे. आता दर सहा मिनिटाला ट्रेनसेवा ही पुरवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून 490 ऐवजी 554 फेर्‍या होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news