Pimpri Rain Update: पिंपरीत पावसाचा धुमाकूळ! महापालिकेकडून शहरात पथके तैनात; अधिकारी तीन शिफ्टमध्ये काम करणार

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीआपत्ती व्यवस्थापनासाठी तीन शिफ्टमध्ये आपत्कालीन कामकाज अधिकारी व कर्मचार्‍यांची पथके तैनात केली आहेत.
Pimpri Rain Update
पिंपरीत पावसाचा धुमाकूळ! महापालिकेकडून शहरात पथके तैनात; अधिकारी तीन शिफ्टमध्ये काम करणारPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांवरील धरणामधून करण्यात येणार्‍या विसर्गामुळे तसेच, पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्ती व्यवस्थापन व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून विशेष पावले उचलण्यात आली आहेत.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीआपत्ती व्यवस्थापनासाठी तीन शिफ्टमध्ये आपत्कालीन कामकाज अधिकारी व कर्मचार्‍यांची पथके तैनात केली आहेत. (Latest Pimpri News)

Pimpri Rain Update
Ganesh Utsav 2025: गणरायासाठी कापडी फुले अन् पाने

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच. पुणे जिल्ह्यासह घाट परिसरात अतिवृष्टी होत असल्याने व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी सातत्याने संपर्कात राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहावे. परिस्थितीनुसार आपत्ती निवारणाचे कार्य तातडीने व समन्वयाने पार पाडावे, असे आयुक्त सिंह यांनी आदेश दिले आहेत.

Pimpri Rain Update
Pimpri Rain: पिंपरीत जोरदार पावसाची हजेरी; पावसामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी

शिफ्टनिहाय नियुक्त करण्यात आलेले अधिकारी

-सकाळची शिफ्ट (सकाळी 6 ते दुपारी 2) : समन्वय अधिकारी - कार्यकारी अभियंता संध्या वाघ (संपर्क क्रमांक : 9922501758).सहाय्यक अधिकारी -उपअभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, सहाय्यक स्थापत्य अभियंता प्रफुल्ल भोकरे, मुख्य लिपिक सुनील चव्हाण, लिपिक गोविंद गर्जे.

-दुपारची शिफ्ट (दुपारी 2 ते रात्री 10) : समन्वय अधिकारी - कार्यकारी अभियंता विजय भोजने (संपर्क क्रमांक : 9922501768). सहाय्यक अधिकारी -उपअभियंता सुनील दांगडे, कनिष्ठ अभियंता पंकज धेंडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता चिन्मय कडू, मुख्य लिपिक मुरगू बोटे, लिपिक शिधाजी जाधव.

-रात्रीची शिफ्ट (रात्री 10 ते सकाळी 6) : समन्वय अधिकारी -कार्यकारी अभियंता सुनील पवार (संपर्क क्रमांक : 9922501948). सहाय्यक अधिकारी -उपअभियंता शाम गर्जे, कनिष्ठ अभियंता राजदीप तायडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता शेषेराव अटकोरे, मुख्य लिपिक भरत कोकणे, लिपिक विनायक रायते.

नदीकाठच्या रहिवाशांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना

शहरातील आपत्कालीन पूरस्थिती हाताळण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून नदीकाठच्या घाट परिसरात पाहणी करण्यात आली आहे. ज्या भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते, अशा परिसरात विशेष लक्ष ठेवले जात आहे. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये

नागरिकांनी अतिवृष्टीदरम्यान धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news