Ganeshotsav Mahaprasad FDA Rules: गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी नवा नियम! केटरर्सना एफडीएची पूर्वपरवानगी आवश्यक

कार्यक्रमाच्या सात दिवस आधी पूर्वनियोजन अर्ज बंधनकारक; एफएसएसएआय परवाना, पाणी तपासणी अहवालासह विविध माहिती द्यावी लागणार
Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Ganeshotsav Mahaprasad FDA RulesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद आणि सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमांसाठी परवानाधारक केटरर्सना आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) आवश्यक प्रकिया पूर्ण करावी लागणार आहे. महाप्रसादाची ऑर्डर घेण्यापूर्वी संबंधित परवानाधारक केटरर्सनी एफडीएचा अधिकृत पूर्वनियोजन अर्ज नमुना भरुन संबंधित झोनच्या अन्न सुरक्षा आधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. शहरातील परवानाधारक केटरर्सना मंडळाकडून महाप्रसाद तसेच अन्य सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमांची ऑर्डर ही एफडीएची प्रक्रिया पूर्ण करूनच घेता येणार आहे. हा नियम केवळ गणेशोत्सवासाठी मर्यादित नसून, आगामी सण- उत्सवांच्या काळात आयोजित होणाऱ्या महाप्रसाद व सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमांसाठीही लागू करण्यात आला आहे.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Pimpri Chinchwad Footpaths: पिंपरी-चिंचवडमध्ये पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर! २१६० किमी रस्त्यांपैकी केवळ ३६८ किमीवर पदपथ

मंडळांनीही केटरर्सकडे विचारणा करणे गरजेचे

गणेशोत्सवात मोठया प्रमाणावर भविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या पार्श्वभूमीवर महाप्रसाद तयार करणाऱ्या केटरर्सकडून अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन होते आहे की नाही यांची माहिती प्रशासनाकडे सणापूर्वीच उपलब्ध व्हावी, यासाठी ही प्रकिया राबिण्यात येत आहे.या प्राकियेमुळे महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी केटरर्सची निवड करताना मंडळांनीही संबंधित केटरर्सकडे आवश्यक प्रकिया पूर्ण झालेली आहे की नाही, याची खात्री करणे महत्वाचे आहे.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Pimpri Ganeshotsav Travel: गणेशोत्सवात गावी जाणे महागले! खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची आर्थिक लूट

केटरर्सनेही प्रक्रिया पूर्ण आवश्यक

गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठया प्रमाणावर अन्न तयार केले जाते आणि भविकांनमध्ये वाटप केले असल्याने अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यासाठी एफडीएकडून ही प्रकिया राबविण्यात येत आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या केटरर्सविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे केटरर्सनी महाप्रसाद किंवा सामूहिक भोजनाची ऑर्डर स्वीकारण्यापूर्वी एफडीएची निर्धारित प्रकिया पुर्ण करुन अन्नसुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Lonavala DJ Free Ganeshotsav: लोणावळ्यात गणेशोत्सवात डीजेला लगाम; मोठ्या आवाजात साउंड वाजवल्यास कारवाईचा इशारा

केटरर्सवाल्यांनी सात दिवसापूर्वी नियोजन नमुना दयावा

महाप्रसादाच्या कार्यक्रम आयोजित करण्याच्या किमान सात दिवसाआधी संबंधित केटरर्सनी एफडीएचा आधिकृत पूर्वनियोजन नमुना भरुन संबंधित झोनच्या एफडीए अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. ही प्रकिया मंडळानी नव्हे, तर अन्न तयार करुन पुरवठा करणाऱ्या संबंधित पूर्ण करायचे आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच केटरर्सना संबंधित गणेश मंडळाकडून महाप्रसाद तसेच अन्य सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमाची ऑर्डर घेता येऊ शकेल.

Ganeshotsav Mahaprasad FDA Rules
Sangvi Ganeshotsav Rules: सांगवीत गणेश मंडळांना पोलिसांचा सज्जड दम; डीजे-डॉल्बीवर गुन्हा, लेझरवर थेट बंदी

अन्न व औषध प्रशासनास द्या ही माहिती

केटरर्सनी कार्यक्रमाचे ठिकाण, दिनांक, त्यासह अपेक्षित लाभार्थी संख्या , तयार करण्यात येणारे अन्न पदार्थ, आयोजकाची माहिती नमुन्यात नमूद करणे आवश्यक आहे. याशिवाय कॅटरर्सच्या एफएसएसआय परवाना क्रमांक व वैधता, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची वैद्यकीय तपासणी, पाण्याचे स्त्रोत व पाणी तपासणी अहवाल, तसेच प्रमाणित अन्नसुरक्षा पर्यवेक्षकाचे नाव , प्रमाणपत्र क्रमांक ही सर्व माहिती द्यावी लागणार आहे. तसेच तयार अन्नाचा नमुना ४८ तास जतन करण्याची व्यवस्था आणि कच्च्या मालाच्या पुरवठादाराची माहिती प्रशासनाला सादर करावी लागणार आहे.

गणेशोउत्सवात महाप्रसाद करणाऱ्या केटरर्स Festival.MahaFDA.in या पोर्टलवर अर्ज भरणे गरजेचे आहे. तसेच त्यांचाकडे अन्नपदार्थ परवामा असणे बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल.

दिगंबर भोगावडे, सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news