Pimpri Flyover Safety: पिंपरीतील फ्लायओव्हर धोक्याच्या छायेत; भिंतींना तडे, सैल प्लास्टर अन् झाडांच्या मुळांचा धोका

‘स्ट्रक्चरल ऑडिट सुरू’च्या आश्वासनांवर नागरिकांचा सवाल; तातडीने डागडुजी, बॅरिकेडिंग आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
Pimpri Flyover
Pimpri FlyoverPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: शहरातील फ्लायओव्हर, पूल आणि त्यांच्या संरक्षक भिंतींच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी फ्लायओव्हरच्या भिंतींना तडे गेले असून, झाडांच्या मुळांनी भिंती आणि प्लास्टरला तडे जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी प्लास्टर सैल झाले असून, ते कधीही खाली कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Pimpri Flyover
Pudhari Maval Gaurav: कर्तृत्ववानांचा ‘पुढारी मावळ गौरव’ने सन्मान; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जल्लोषात गौरव

पालिकेकडून 'स्ट्रक्चरल ऑडिट सुरू आहे', 'झाडांच्या फांद्या व मुळे हटविण्यात येतील', 'धोकादायक भागांची पाहणी केली जात आहे' अशी उत्तरे वेळोवेळी दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात धोकादायक ठिकाणांची तातडीने डागडुजी, सैल प्लास्टर काढणे, आवश्यक बॅरिकेडिंग किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती होताना कितपत दिसते, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विशेषतः ज्या ठिकाणी फ्लायओव्हरच्या भिंतीलगत नागरिकांची वर्दळ असते, त्याठिकाणी सैल झालेला प्लास्टर किंवा काँक्रीटचा भाग अचानक कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. दुचाकीस्वाराच्या अंगावर किंवा वाहनाच्या मार्गात अचानक मलबा पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pimpri Flyover
Prithika Pradeep Archery: पिंपरीच्या प्रिथिकाची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी; सांघिक धनुर्विद्येत भारताला सुवर्ण पदक

झाडांच्या मुळांनी संरचनेला धोका

फ्लायओव्हरच्या भिंतीलगत वाढणारी झाडे आणि त्यांच्या मुळांचा संरचनेवर होणारा परिणाम हा स्वतंत्रपणे तपासण्याची गरज आहे. झाडे तोडणे हा एकमेव उपाय नसून, संरचनेला नुकसान होत असल्यास त्याची कारणमीमांसा, तांत्रिक तपासणी आणि कायमस्वरूपी दुरुस्ती आवश्यक आहे. नागरिकांच्या डोक्यावर धोका असताना प्रशासनाने 'पाहणी सुरू आहे' या भूमिकेतून बाहेर पडून 'दुरुस्ती पूर्ण झाली' अशी भूमिका घेण्याची गरज आहे.

Pimpri Flyover
Hinjewadi Shivajinagar Metro: Good News! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १५ दिवसांत सुरू होणार

'ऑडिट'नंतर पुढे काय?

स्ट्रक्चरल ऑडिट करणे ही आवश्यक प्रक्रिया आहे; मात्र, ऑडिटमध्ये धोका निदर्शनास आल्यानंतर त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. अहवाल तयार होऊन तो कार्यालयीन कागदपत्रांमध्येच राहिला, तर नागरिकांचा धोका कमी होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात यापूर्वीही झाडे, पूल, फ्लायओव्हर आणि त्यांच्या परिसरातील धोकादायक स्थितीबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, प्रत्येक वेळी पाहणी, कारवाई आणि दुरुस्तीचे आश्वासन देण्यापलीकडे परिस्थितीत अपेक्षित बदल होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Pimpri Flyover
Hinjewadi PMRDA Development: पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडीचा समावेश झाला तरी सुरू कामे पीएमआरडीए पूर्ण करणार

आश्वासनांवर नाही, प्रत्यक्ष कृतीवर भर हवा!

फ्लायओव्हरच्या सुरक्षेबाबत केवळ स्ट्रक्चरल ऑडिट, पाहणी आणि झाडे हटविण्याची आश्वासने नकोत. धोकादायक ठिकाणांवरील सैल प्लास्टर व काँक्रीट तातडीने हटविणे, आवश्यक ठिकाणी बॅरीकेडिंग करणे, झाडांच्या मुळांमुळे झालेली संरचनात्मक हानी दुरुस्त करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने आताच ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

फ्लायओव्हर आणि पुलांच्या सुरक्षेचा विषय केवळ स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालापुरता मर्यादित राहू नये. शहरातील सर्व फ्लायओव्हरची धोकादायक ठिकाणांची यादी, तातडीच्या दुरुस्तीची कार्यवाही, सैल प्लास्टर हटविणे, आवश्यक बॅरीकेडिंग आणि संरचनेला बाधा आणणाऱ्या झाडांवर तांत्रिक उपाय याबाबत स्पष्ट कृती आराखडा पालिकेने जाहीर करावा.

सुजीत परकाळे, स्थानिक रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news