

पिंपरी: चाकण येथील मेदनकरवाडी येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. 13) रोजी रात्री येथे घडली. याप्रकरणी बाळासाहेब मेदकर (55) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित मेदनकर (40), सुभाष मेदनकर (70) आणि अंजली (65) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ, चुलते आणि चुलती हे फिर्यादीच्या घरासमोर खडीची हायवा गाडी घेऊन खाली करण्यासाठी आले होते. फिर्यादीने त्यांना गावठाण जागेत गाडी खाली करू नका असे सांगितले असता, या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले.
आरोपी अमित याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या छातीवर डाव्या बाजूस मारून त्यांच्या डाव्या बाजूच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर करून गंभीर दुखापत केली. चाकण पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.