वर्षा कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या 105 शाळांपैकी भोसरी मुले 4 व भोसरी कन्या 2, पठारे मळा, काळेवाडी कन्या शाळा 56/2 व काळेवाडी मुले 56/2 या शाळांच्या तीन इमारती धोकादायक ठरविण्यात आलेल्या आहेत. शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून, गेल्याच वर्षी या इमारतीला धोकादायक ठरविण्यात आले आहे.
पाडण्यात आलेल्या धोकादायक शाळा
यापूर्वी केशवनगर माध्यमिक शाळा, वाल्हेकरवाडी शाळा, भोसरी माध्यमिक शाळा यांची मुदत संपली होती. या शाळा पाडण्यात आल्या असून, नवीन ठिकाणी इमारतीमध्ये शाळा स्थलांतरीत केल्या आहेत. केशवनगर शाळेचे नुकतेच भूमीपूजन झाले आहे. ही शाळा चापेकर चौकातील हुतात्मा चापेकर शाळेत स्थलांतरीत करण्यात आली आहे. (Latest Pimpri News)
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
मुलांना शिक्षण आनंददायी मिळावे आणि शाळेत मुलांची संख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या भोसरी मुले 4 आणि भोसरी कन्या ही शाळा एकाच इमारतीत दोन सत्रामध्ये भरत होती. या इमारतीमधील मुलांना दुसर्या इमारतीमध्ये स्थालांतरीत करण्यात आले आहे.
मात्र, काळेवाडी 56/2 मुले आणि मुलींची शाळा एकाच इमारतीमध्ये दोन सत्रात भरत आहे आणि पठारे मळा ही शाळा मुदत संपलेल्या इमारतीमध्येच भरत आहे. इमारतीची दुरवस्था झाली असून, ती धोकादायक बनली आहे. शाळा आता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. स्थापत्य विभागाने या इमारतीच्या बांधकामाची मुदत संपल्याचे सांगितले आहे. तरीदेखील या इमारतीत आजही वर्ग भरविले जात आहेत. महापालिका एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळच खळेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
केवळ रंगरंगोटीवर भर
मुदत संपल्यामुळे शाळेला बाहेर रंग देण्याखेरीज कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. सुविधा द्याव्यात तर इमारत कधी खाली करावी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सुविधांचा होणारा खर्च पाण्यात जाईल म्हणून कोणतीही सुधारणा केली जात नाही.
एक तर सोयीसुविधा नाही तर त्यात जीवाची भीती, अशा परिस्थिती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारती मोडकळीस आल्यानंतरही त्याची दुरुस्ती तसेच पुनर्विकासाबाबत तत्परतेने पावले उचलली जात नाहीत. यामुळे दुर्घटना होण्याची वेळ या इमारतींवर येऊ नये हीच अपेक्षा.
केवळ रंगरंगोटीवर भर
मुदत संपल्यामुळे शाळेला बाहेर रंग देण्याखेरीज कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. सुविधा द्याव्यात तर इमारत कधी खाली करावी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सुविधांचा होणारा खर्च पाण्यात जाईल म्हणून कोणतीही सुधारणा केली जात नाही. एक तर सोयीसुविधा नाही तर त्यात जीवाची भीती, अशा परिस्थिती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारती मोडकळीस आल्यानंतरही त्याची दुरुस्ती तसेच पुनर्विकासाबाबत तत्परतेने पावले उचलली जात नाहीत. यामुळे दुर्घटना होण्याची वेळ या इमारतींवर येऊ नये हीच अपेक्षा.
पालक,विद्यार्थी अनभिज्ञ
शाळांच्या इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या गोष्टीपासून पालक आणि विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. गोरगरीब पालकांची मुले शिक्षणाच्या आसेपोटी शाळेत येतात. याकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या शाळेची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे देण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.
भोसरीची शाळा दुसर्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून काळेवाडी शाळेला पत्र पाठविण्यात आले आहे. ही शाळा पाडणार नसून तिची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तोपर्यंत पार्किंगमध्ये रूम तयार करुन तात्पुरती सोय करण्यात येणार आहे.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, मनपा