Pimpri Chinchwad Water Conservation: पाणी वाया घालवाल तर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा इशारा

पाणी बचतीसाठी महापालिकेची विशेष मोहीम; गळके नळ दुरुस्त करण्यासह उद्याने व मैदानांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याचे निर्देश
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या सर्वच विभागप्रमुखांनी पाण्याचा अपव्यय आणि नासाडी करू नये. तसे केल्यास तसेच, पाणी बचतीकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
YCM Hospital Police Attack: वायसीएम रुग्णालयात पोलिस हवालदारावर जीवघेणा हल्ला; तिघे ताब्यात

शहरासाठी पवना धरणातून 520 एमएलडी, भामा-आसखेड धरणातून 167 एमएलडी आणि आंद्रा धरणातून 100 एमएलडी असे एकूण 787 एमएलडी पाणी आरक्षित आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात पवना नदीचे 520 एमएलडी आणि आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीतून 100 एमएलडी असे एकूण 620 एमएलडी अशुद्ध पाणी उचलले जाते. तर, एमआयडीसीकडून 30 एमएडी शुद्ध पाणी घेतले जाते. सध्या वितरण व्यवस्थेनुसार शहरात गेल्या सहा वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad AI Traffic Signals: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी फुटणार? आता AI सिग्नलद्वारे वाहतुकीचे नियंत्रण

पवना धरण आणि आंद्रा धरणात 95 टक्के पाणी साठा आहे. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठा व मागील वर्षाचा अनुभव विचारात घेऊन पाणी बचतीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

कार्यालय, इमारतींमधील गळके नळ दुरुस्त करा

महापालिका भवन, सर्व दहा क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, भाजी मंडई तसेच, महापालिकेच्या इतर इमारतींमधील नळ व पाणीपुरवठा उपकरणांची तपासणी करावी. पाणीगळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे निर्देश स्थापत्य व पाणीपुरवठा विभागांना देण्यात आले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Thergaon Natural drain: थेरगावात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्याचा आरोप; बांधकाम परवानगीवर प्रश्न

मैदानावर तसेच झाडांसाठी प्रक्रिया केलेले पणी वापरा

शिक्षण विभागाने शहरातील शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करावी. आरोग्य विभागाने सार्वजनिक स्वच्छतागृहांसह विभागाच्या अंतर्गत येणार्‍या इतर ठिकाणी गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. क्रीडा विभागाने मैदानांवर पाणी फवारण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून आवश्यकतेनुसार प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करावा. उद्यान विभागाने झाडांना तसेच, उद्यानात पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करााव, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Crime News: इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ डिलीट केल्याने विद्यार्थिनीवर चाकूहल्ला; म्हाळुंगेतील घटना

पाणीगळती तातडीने थांबवा

पाणी गळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण महापालिकेच्या सर्व इमारतींमधील पाणीगळतीची नियमित तपासणी करणे, आढळलेली गळती संबंधित विभागास तात्काळ कळवून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करावी. दुरुस्तीनंतरही गळती होणार नाही, यासाठी सातत्याने देखरेख ठेवावी. पाणीपुरवठा विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने भौगोलिक स्थानाच्या आधारे (जीपीएस) पाणी गळतीच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण करून दुरुस्तीनंतर पुन्हा गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाण्याचा अपव्यय रोखण्यामध्ये प्रभावी कामगिरी करणार्‍या प्लंबरचा सत्कार करण्यात यावा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

पाण्याचा अनावश्यक वापर टाळा

पाणी बचतीसाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित तपासणी करून आवश्यक उपाययोजना करावी. शाळा, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य महापालिका आस्थापनांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. पाणी बचतीच्या उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news