Pimpri Chinchwad Traffic Police: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; १५ दिवसांत १९ हजार वाहनांवर कारवाई

नो पार्किंग, काळ्या काचा, मद्यप्राशन प्रकरणांवर कठोर कारवाई; तब्बल १.८५ कोटी रुपयांचा दंड वसूल
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अवघ्या १५ दिवसांत १९ हजार वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईत एक कोटी ८५ लाख १३ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Traffic Police
Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडमध्ये 15% पाणी कपात; पवना धरणात केवळ 19% साठा

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे, तर हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी हब आहेत. तसेच, देहू आणि आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्रे असून, शहरातून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्ग जातात. त्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Traffic Police
Pimpri Water Cut: पिंपरी-चिंचवडमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू; एल-निनोचा परिणाम, उद्यापासून अंमलबजावणी

दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत काळ्या काचा लावलेल्या २ हजार ५६२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. बदल केलेले सायलेन्सर वापरणाऱ्या १ हजार १८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Traffic Police
Lonavala Traffic Police Action: लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई

जड-अवजड वाहनांच्या ४ हजार ४४४ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणाऱ्या १० हजार ६०७ वाहनांवर दंड ठोठावण्यात आला. तसेच, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४०४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.या सर्व कारवायांमधून एकूण एक कोटी ८५ लाख १३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news