Pimpri Chinchwad Smart City Company: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी मार्च 2026 मध्ये गुंडाळणार

स्मार्ट सिटीचे प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित; महापौर रवी लांडगे यांची संचालकपदी नियुक्ती
Smart City Company
Smart City CompanyPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड स्मार्ट लिमिटेड कंपनी पुढील महिन्यात गुंडाळण्याची कार्यवाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. त्या स्मार्ट सिटी कंपनीवर महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची संचालक म्हणून शुक्रवार (दि. 13) नियुक्ती करण्यात आली. महापौर लांडगे हे व्हिडिओ कॉम्फरन्सच्या माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.

Smart City Company
Pimpri Metro Station Entry Gate: पिंपरी मेट्रो स्टेशनचा चौथा जिना शनिवारपासून प्रवाशांसाठी खुला

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक पुण्यातील विभागीय कार्यालयात झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सहशहर अभियंता मनोज सेठिया, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे व अधिकारी उपस्थित होते.

Smart City Company
Valentine Day Police Alert: व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस अलर्ट

बैठकीत स्मार्ट सिटीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आलेल्या विविध कामांची तसेच, प्रकल्पांची माहिती देण्यात आली. किती प्रकल्प पूर्ण झाले. तर, किती प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, याची माहितीही सादर करण्यात आली.

Smart City Company
Nigdi Green Bridge Project: निगडी प्राधिकरणातील ‘हरित सेतू’ प्रकल्प ठरतोय शहर विकासाचा नवा मानदंड

सत्तारूढ पक्षनेते शितोळे व विरोधी पक्षनेते भोईर यांची स्मार्ट सिटीच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या प्रकल्प आणि कामांची सविस्तर माहिती स्वतंत्र बैठक घेऊन देण्याच्या सूचना महापौर लांडगे यांनी दिल्या.

Smart City Company
PCMC Charholi TDR Controversy: चऱ्होली एसटीपी जागेचा टीडीआर वाद; 59 कोटींचा मोबदला थेट 213 कोटींवर

दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनी मार्च 2026 ला बंद करण्यात येणार आहे. कंपनीचे सर्व कामे व प्रकल्प महापालिकेच्या संबंधित विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. तसेच, ऑटो क्लस्टर येथील कंपनीचे कार्यालयही बंद करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेची स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news