Pimpri Chinchwad Rooftop Hotel: पिंपरी-चिंचवडमध्ये रुफटॉप हॉटेलचे पुन्हा सर्वेक्षण; अनधिकृत हॉटेलवर होणार कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये रुफटॉप हॉटेलचे पुन्हा सर्वेक्षण सुरू झाले आहे. परवानगी आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनधिकृत हॉटेलवर महापालिका कारवाई करणार आहे.
Pimpri Chinchwad Rooftop Hotel: पिंपरी-चिंचवडमध्ये रुफटॉप हॉटेलचे पुन्हा सर्वेक्षण; अनधिकृत हॉटेलवर होणार कारवाई
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील इमारतींच्या गच्चीवर असलेल्या रुफटॉप हॉटेल, बार, रेस्टॉरंटचालकांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रुफटॉप हॉटेलचे पुन्हा एकदा सर्वेक्षण हाती घेतले आहे.

सर्वेक्षणानंतर नियमांचे उल्लंघन करणारे, अनधिकृत हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सन 2023 मध्ये अशा रुफटॉप हॉटेलचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात शहरातील विविध भागांत तब्बल 49 रुफटॉप हॉटेल आढळून आले होते.

यामधील अनेक हॉटेलचालकांनी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर हॉटेल सुरू केल्याचे सर्वेक्षणात उघड झाले होते. त्यानंतर महापालिकेने या हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा दिल्या. तसेच, विविध परवानग्या घेण्यासाठी काही मुदत दिली होती.

पूर्णपणे अनधिकृत असलेल्या नऊ हॉटेलांवर कारवाई केली होती. मात्र, मागील अडीच वर्षांत शहरात पुन्हा नव्याने रुफटॉप हॉटेलची संख्या वाढली आहे.

शहरात वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, निगडी, प्राधिकरण, स्पाइन रोड, भोसरी, पिंपरी, कासारवाडी या परिसरात रुफटॉप हॉटेलची संख्या मोठी आहे. इमारतीच्या गच्चीवर कोणतीही परवानगी न घेता हॉटेल अनधिकृतपणे चालविले जात आहेत.

Pimpri Chinchwad Rooftop Hotel: पिंपरी-चिंचवडमध्ये रुफटॉप हॉटेलचे पुन्हा सर्वेक्षण; अनधिकृत हॉटेलवर होणार कारवाई
Pimpri Chinchwad Cyber Fraud: कर्जाच्या आमिषाने ७० बँक खाती केली 'म्यूल'; दोघांना अटक, कोट्यवधींचे व्यवहार उघड

नियमांचे पालन केले जात नाही. पुरेशी अग्रिशमन यंत्रणा नसते, अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा रुफटॉप हॉटेलचे सर्वेक्षण सुरू केले आहे. अनधिकृत किंवा परवानगी न घेता सुरू असलेल्या रुफटॉप हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Pimpri Chinchwad Rooftop Hotel: पिंपरी-चिंचवडमध्ये रुफटॉप हॉटेलचे पुन्हा सर्वेक्षण; अनधिकृत हॉटेलवर होणार कारवाई
Pawana Water Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाच्या निधीची पळवापळवी! प्रकल्पाचे काम गेल्या 15 वर्षांपासून ठप्प

अनधिकृत रुफटॉप हॉटेल पाडणार

शहरातील गच्चीवरील रुफटॉप हॉटेलचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या हॉटेलचालकांनी परवानगी घेतली आहे की नाही, याची पाहणी केली जात आहे. अनधिकृत आणि परवानगी न घेतलेल्या हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news