Pimpri Chinchwad Regional Offices: पिंपरी-चिंचवडमध्ये क्षेत्रीय कार्यालये 8 वरून 10 करण्याची मागणी; आयुक्तांचा नकार

लोकसंख्या वाढीचा मुद्दा पुढे करत भाजपाची मागणी; आठ कार्यालयांमार्फतच कामकाज सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावा
Regional Offices
Regional OfficesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाज सुरळीत व्हावे, म्हणून गेल्या पंचवार्षिकेत सहा क्षेत्रीय कार्यालयांचे आठ क्षेत्रीय कार्यालय करण्यात आले. आताही नगरसेवक संख्या पूर्वीप्रमाणे 128 असताना आठ क्षेत्रीय कार्यालयांचे दहा श्रेत्रीय कार्यालय करण्याची मागणी भाजपाच्या सत्ताधाऱ्यांच्या एका गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, ते शक्य नसल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आता, सत्ताधारी भाजपाकडून काय भूमिका घेतली जाणार, याची उत्सुकता आहे.

Regional Offices
Contract Women Sanitation Workers Night Duty: कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांवर रात्रपाळीची सक्ती; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

फेबुवारी 2017 च्या निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. जागा 128 होत्या. त्यासाठी पूर्वीची वॉर्ड रचना फोडून नव्याने 32 प्रभाग करण्यात आले. निवडणुकीनंतर शहरातील क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करण्यात आली. सहा क्षेत्रीय कार्यालय फोडून आठ क्षेत्रीय कार्यालये करण्यात आली. शहरात 9 ऑगस्ट 2017 ला आठ क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना झाली. राजकीय फायद्यासाठी सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग््रेासने त्या नव्या क्षेत्रीय कार्यालयाच्या रचनेला विरोध केला नाही.

त्या निवडणुकीनंतर तब्बल 9 वर्षांने महापालिकेची निवडणूक झाली. मात्र, नगरसेवक संख्या 128 पूर्वी इतकी कायम आहे. तसेच, प्रभाग रचनाही जुनीच आहे. पुन्हा महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. भाजपाचे अपक्ष धरून एकूण 85 नगरसेवक संख्या आहे. क्षेत्रीय कार्यालय ताब्यात असावी. तसेच, अधिकाधिक नगरसेवकांना क्षेत्रीय अध्यक्षपद भूषवता यावे म्हणून आणि राजकीय सोय पाहण्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांचे दहा क्षेत्रीय कार्यालय करण्याची मागणी सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आली आहे.

Regional Offices
Urse Maval Murder Case: उर्से मावळमध्ये चुलत भावाकडून तरुणाचा खून; आरोपी फरार

सन 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख इतकी आहे. महापालिकेतील नगरसेवक संख्या 128 जुनीच आहे. तसेच, प्रभाग रचनाही जुनीच आहे. शहराचे क्षेत्र वाढलेले नाही. सध्या शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या आसपास आहे. मतदार संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या आधारावर क्षेत्रीय कार्यालयांची संख्या दोनने वाढविण्याची मागणी केली जात आहे. मात्र, महापालिकेच्या दैनंदिन कामकाजांच्या दृष्टीने आठ क्षेत्रीय कार्यालये पुरेसे असून, त्या माध्यमातून कामकाज व्यवस्थित सुरू आहे, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात आठचे दहा क्षेत्रीय कार्यालये होणार नाहीत, असे स्पष्ट झाले आहे.

लोकसंख्या वाढल्याने क्षेत्रीय कार्यालये वाढवा

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार, लोकसंख्या वाढ आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेता सध्याची 8 क्षेत्रीय कार्यालयांची रचना अपुरी ठरत आहे. प्रत्येक कार्यालयावर प्रशासकीय कामांचा प्रचंड ताण असून, नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. लोकसंख्येचे प्रमाण, भौगोलिक विस्तार व प्रशासकीय सुलभतेचा विचार करता क्षेत्रीय कार्यालये संख्या 8 ऐवजी 10 करणे आवश्यक आहे. क्षेत्रीय समित्यांची संख्या 8 वरून 10 करण्यास मान्यता देण्यात यावी. त्यानुसार, पुढील आवश्यक प्रशासकीय व संरचनात्मक कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

Regional Offices
Sant Tukaram Maharaj Germany: जर्मनीतील विठ्ठलधाम मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

क्षेत्रीय कार्यालये बदलल्याने गैरसोय

सन 2017 ला क्षेत्रीय कार्यालये बदलण्यात आले. सहा क्षेत्रीय कार्यालयांची आठ क्षेत्रीय कार्यालये करण्यात आली. महापालिका निवडणुकीत शहरातील प्रभाग रचनेत कोणताही बदल झालेला नाही. नगरसेवक संख्या 128 पूर्वी इतकीच आहे. तसेच, नव्याने जनगणना झालेली नसल्याने शहराची अधिकृत लोकसंख्या किती हा आकडा समोर आलेला नाही. यंदा पुन्हा क्षेत्रीय कार्यालयात बदल केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. नागरिकांना दूर अंतरावरील क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतील. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाची फेररचना न करता सध्य अस्तित्वात असलेल्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फतच कामकाज केले जावे, अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या नगरसेविका मनीषा शाम लांडे यांनी केली आहे.

Regional Offices
Pimpri Chinchwad School Bus Safety: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड; पिंपरी-चिंचवडमध्ये 300 स्कूल वाहनांवर कारवाई

आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत योग्य प्रकारे कामकाज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या फेररचना मागील पंचवार्षिकेत केली आहे. त्यात यंदा पुन्हा बदल करण्याची गरज वाटत नाही. आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत महापालिकेचे कामकाज योग्य प्रकारे सुरू आहे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

क्षेत्रीय कार्यालयांची संख्या न वाढवण्याची कारणे

  • सन 2011 नंतर जनगणना झालेली नाही

  • नगरसेवक संख्या 128 कायम

  • 32 प्रभागांची रचना जुनीच

  • शहरात नव्या गावांचा समावेश झालेला नाही

  • महापालिकेच्या आकृतीबंधातून मनुष्यबळाची कमतरता

  • आठ क्षेत्रीय कार्यालयांनुसार महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news