Contract Women Sanitation Workers Night Duty: कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांवर रात्रपाळीची सक्ती; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरीतील महिला कामगारांचा संताप, ड्युटी बदलली नाही तर महापालिका भवनासमोर आंदोलनाचा इशारा
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

खराळवाडी: पिंपरी शहर, उपनगरांतील कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागाकडून मागील सहा महिन्यांपासून रात्रपाळीची ड्युटी लावण्यात आली आहे. यामुळे महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून मोठा अन्याय केला जात आहे. यामुळे महिला कर्मचार्ऱ्यांच्या कामाच्या ड्युटीमध्ये बदल करावा, अशी मागणी होत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Urse Maval Murder Case: उर्से मावळमध्ये चुलत भावाकडून तरुणाचा खून; आरोपी फरार

महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळणे, कामावरून अचानक काढून टाकणे, कामाच्या ठिकाणी गैरवर्तन, कमी वेतन आणि सुविधांचा अभाव, इतर कायद्यानुसार मिळणाऱ्या सुविधा न देणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. घरामध्ये त्यांना वेळ देण्यासाठी शिफ्टमध्ये काम करणे सहाजिक होते; परंतु आरोग्य विभाग त्यांच्या सामाजिक-आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर सतत रात्रपाळीची ड्युटी लादत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Sant Tukaram Maharaj Germany: जर्मनीतील विठ्ठलधाम मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

तरी सफाई महिला कर्मचाऱ्यांनी ड्युटी बदलून मागितली तर अचानक त्यांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले जाते. वेतनात काटकसर करून वेतन पुढे ढकलणे या सारख्या अडचणीचा सामना करावा लागतो. तरी महापालिका आरोग्य विभागाने या कंत्राटी महिला साफसफाई कर्मचाऱ्यांची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी सफाई कामगार संघटनेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad School Bus Safety: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड; पिंपरी-चिंचवडमध्ये 300 स्कूल वाहनांवर कारवाई

आम्हाला गेले सहा महिने झाले रात्रपाळीची ड्युटी जबरदस्तीने लादली आहे. रात्रपाळीला ड्युटीला येताना चौकाचौकांत तळीराम बसलेले असतात. त्याची भीती वाटते. शिवाय रात्रपाळीला काम, दिवसा मुलांची शाळा त्यांची तयारी, घरातील जबाबदारी यामुळे दैनंदिन शिफ्टमध्ये काम असावे, अशी भावना महिला कामगारांनी व्यक्त केली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Smart City Company: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी मार्च 2026 मध्ये गुंडाळणार

येत्या काही दिवसांत कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना दिवसपाळीची शिफ्टप्रमाणे ड्युटी बदलून देण्याची मागणी महापालिका प्रशासनाला केली आहे. जर अंमलबजावणी न केल्यास काही दिवसांत महापालिका भवन समोर आंदोलन छेडले जाईल.

सुवर्णा निकम, शहराध्यक्षा अखिल भारतीय मजदूर सफाई कामगार संघटना

कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांना रात्रपाळीची ड्युटी बंद आहे. दिवसा काही भागात दुकाने चालू असल्याने साफसफाईचे काम करताना अडचणी येतात. त्यामुळे रात्रपाळीला पुरुष सफाई कामगारांकडून काम केले जाते.

तानाजी दाते, आरोग्य सहायक अधिकारी, क प्रभाग कार्यालय, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news