Pimpri Chinchwad Pulse Polio Campaign: पिंपरी-चिंचवडमध्ये 28 जूनला पल्स पोलिओ मोहीम; 1123 केंद्रांवर लसीकरणाची तयारी पूर्ण

0 ते 5 वर्षांतील बालकांसाठी दोन थेंब पोलिओ लस देण्याचे आवाहन; 5000 कर्मचारी मोहिमेत सहभागी
Polio Vaccination
Polio VaccinationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार (दि. २८) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

Polio Vaccination
Pimpri Chinchwad Water Project: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीप्रकल्पांसाठी 550 कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय; पवना योजना पुन्हा सुरू होणार

या मोहिमेअंतर्गत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत.

Polio Vaccination
Pimpri Street Light Theft: पिंपरी-चिंचवडमध्ये अर्बन स्ट्रीटवरील 100 हून अधिक दिव्यांची चोरी; शहरात खळबळ

शहरातील ५ वर्षांखालील सर्व बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळेतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी तीन नाईट टीम कार्यरत असतील. यासाठी सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Polio Vaccination
Pimpri Fire Safety Coaching Classes: पिंपरी-चिंचवडमधील कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न; अग्निशमन विभागाचा इशारा

सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

Polio Vaccination
Lonavala Water Yoga: लोणावळ्यात योग साधकाचा अनोखा प्रयोग; पाण्यावर योग साधनेचा विक्रम करण्याची तयारी

मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटिंग, व्हि.एम.डी डिस्प्ले सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news