Pimpri Chinchwad Police: ‘हद्दीचा राजा’ आता नियंत्रण कक्षात; पिंपरी-चिंचवडमधील वरिष्ठ निरीक्षकांची एक दिवस ड्युटी

‘व्हिजिबल पोलिसिंग’वर भर; बीट मार्शल, डायल ११२, दामिनी पथक आणि सेवा ॲपच्या कामकाजावर थेट नजर
Police
PolicePudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि दैनंदिन कारभाराची सूत्रे हाताळणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांना आता एक दिवस नियंत्रण कक्षाची ड्युटी करावी लागत आहे. एरवी अधिनस्त यंत्रणेकडून काम करून घेणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सकाळी सात ते रात्री आठपर्यंत नियंत्रण कक्षात बसून शहरातील पोलिसी प्रतिसाद यंत्रणेवर नजर ठेवत आहेत. ‘व्हिजिबल पोलिसिंग’च्या या उपक्रमातून प्रभारी अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाण करून देणे, हा यामागील उद्देश आहे.

Police
Bhosari Smart Meter Electricity Theft: स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; भोसरीत वीजचोरीची १९ प्रकरणे उघड, नऊ जणांवर गुन्हे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तळेगाव दाभाडे, पिंपरी, चिखली, चिंचवड, हिंजवडी, दक्षिण चाकण, सांगवी, भोसरी, निगडी, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, आळंदी, रावेत, वाकड, संत तुकारामनगर, काळेवाडी, दापोडी, बावधन, शिरगाव, दिघी, दक्षिण महाळुंगे, उत्तर महाळुंगे आणि उत्तर चाकण या २४ पोलिस ठाण्यांच्या प्रभारी वरिष्ठ निरीक्षकांना टप्प्याटप्प्याने ही जबाबदारी देण्यात आली आहे. २१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्याला नेमून दिलेल्या दिवशी सकाळी सात ते रात्री आठपर्यंत नियंत्रण कक्षात उपस्थित राहावे लागते. दिवसभरातील कार्यवाहीचा अहवाल पोलीस उपायुक्त मुख्यालय यांना सादर करावा लागतो. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजाची माहिती द्यावी लागते.

Police
Lonavala Skywalk Tree Cutting: लोणावळ्यात स्कायवॉकसाठी १९ झाडे तोडणार?; २२ झाडांच्या पुनर्रोपणाच्या प्रस्तावानेही नागरिक नाराज

बीट मार्शलच्या ‘लोकेशन’ची पडताळणी

बीट मार्शल नियमित पेट्रोलिंग करतात का, नियंत्रण कक्षाच्या कॉलला उत्तर देतात का आणि त्यांची जीपीएस प्रणाली सुरू आहे का, हे तपासले जाते. जीपीएस विनाकारण बंद ठेवले जाणार नाही, याचीही खात्री केली जाते. त्यामुळे गस्तीची नोंद आणि प्रत्यक्ष हालचाल यामध्ये तफावत राहू नये, यावर भर देण्यात येत आहे.

नाराज नागरिकांशी थेट संपर्क

‘सेवा ॲप’वर असमाधानकारक अभिप्राय नोंदविलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांची समस्या जाणून घेणे आणि तिचे निराकरण करून घेणे, हे देखील एक दिवसाच्या ड्युटीचा भाग आहे. व्हॉट्स ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारींचाही संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठपुरावा केला जात आहे.

Police
Pimple Gurav Toilet Signboards: एकाच स्वच्छतागृहासाठी तीन दिशादर्शक फलक; एक थेट पदपथावरच! पिंपळे गुरवमध्ये महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

‘हद्दीचा राजा’ एक दिवस नियंत्रण कक्षात

पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी हा आपल्या हद्दीतील संपूर्ण यंत्रणेचा प्रमुख म्हणजेच राजा असतो. मात्र, या ड्युटीदरम्यान त्याला स्वतःच्या हद्दीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण आयुक्तालयाच्या पोलिसी व्यवस्थेकडे पाहावे लागते. एरवी अधिनस्तांकडून अपेक्षित असलेली सतर्कता, शिस्त आणि तत्परता याची जाणीव प्रभारी अधिकाऱ्यांनाही या माध्यमातून होत आहे.

‘व्हिजिबल पोलिसिंग’ म्हणजे नेमके काय?

रस्त्यावर केवळ पोलिस दिसणे एवढ्यापुरती ‘व्हिजिबल पोलिसिंग’ची संकल्पना मर्यादित नाही. ठरलेल्या ठिकाणी पोलिस वाहने तैनात आहेत का, मोबाईल वाहने वायरलेसवर सतर्क आहेत का, बीट मार्शल गस्त घालत आहेत का, डायल ११२ चे वाहन वेळेत पोहोचते का आणि दामिनी पथकाची गस्त सुरू आहे का, यावर देखरेख ठेवण्याची ही व्यवस्था आहे.

डायल ११२च्या प्रतिसाद वेळेवर नजर

आपत्कालीन मदतीसाठी आलेल्या डायल ११२ कॉलवर संबंधित वाहन किती वेळात घटनास्थळी पोहोचते, याची नोंद घेतली जाते. प्रतिसाद वेळ चांगला दाखविण्यासाठी तक्रारदाराला आधी फोन करणे किंवा एमडीटी ट्रॅकिंग सिस्टीम बंद करून चुकीची माहिती सादर होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेशात नमूद आहे.

Police
Pimpri Chinchwad Women Counselling: वाकडमधील विवाहित महिलेच्या जीवन संपवल्याने सभागृहात संताप; पिंपरी-चिंचवडमध्ये १० समुपदेशन केंद्रे सुरू होणार

दामिनी पथकावरही लक्ष

महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत दामिनी पथक शाळा, महाविद्यालये, क्लासेस, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी भेट देत आहे का, याची शहानिशा केली जाते. आवश्यकतेनुसार महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ११०/११७ अन्वये कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित वरिष्ठ निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

अपर आयुक्तांच्या परवानगीशिवाय दांडी नाही

महत्त्वाचा बंदोबस्त किंवा गंभीर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यास या ड्युटीवर गैरहजर राहण्यासाठी अपर पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. संबंधित अधिकारी उपस्थित राहू शकला नाही, तर त्या दिवशी नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक व्हिजिबल पोलिसिंगचे काम पाहत आहेत.

डायल ११२, बीट मार्शल पेट्रोलिंग, सेवा ॲप आणि दामिनी पथक आदींच्या सेवांमध्ये गुणात्मक दर्जात वाढ होणे आवश्यक आहे. नागरिकांना अधिक तत्पर आणि परिणामकारक सेवा मिळावी, यासाठी या यंत्रणेवर बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. यासाठी प्रत्येक वरिष्ठ निरीक्षकांना एक दिवस जबाबदारी देण्यात येत आहे.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news