Pimpri Chinchwad Ganesh Visarjan: बाप्पाच्या विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज! १०१ कृत्रिम हौद, जीवरक्षक अन् अग्निशमन पथके तैनात

विसर्जन घाटांवर अग्निशमन जवान, जीवरक्षक, वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात; निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था
Pimpri Chinchwad Ganesh Visarjan
Pimpri Chinchwad Ganesh VisarjanPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील विसर्जन घाटांवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. घाटांवर कृत्रिम हौदांसह, मूर्ती संकलन केंद्र आणि निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी घाटांवर अग्निशमन जवान, जीवरक्षकांसह वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आदी तैनात करण्यात आले आहेत. तसेच, पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील सर्वच विसर्जन घाटांवर एकूण 101 कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. त्यात स्वच्छ पाणी भरण्यात आले आहे. निर्माल्य जमा करण्यासाठी कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन घाटांवर गर्दी होऊ नये; तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन विभागाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष अग्निशमन वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच, जीवरक्षक, आपदा मित्र, सर्पमित्र, प्राणीमित्र नेमण्यात आले आहेत.

Pimpri Chinchwad Ganesh Visarjan
Pimpri Chinchwad BJP Corporators: पिंपरीतील भाजप नगरसेवकांना ‘शिस्तीचे धडे’; फडणवीस घेणार प्रशिक्षण

विसर्जनाच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही पथके आवश्यकतेनुसार मदत करणार आहेत. विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित स्टाफ नर्स, वॉर्डबॉय यांचा समावेश आहे.

आतापर्यंत 63 हजार 558 मूर्तींचे संकलन

पालिकेच्या दहा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील सर्व विसर्जन घाटांवर गणेशमूर्ती विसर्जनांनंतर त्याचे संकलन केले जात आहे. 14 ते 23 सप्टेंबर या नऊ दिवसांच्या कालावधीत 63 हजार 558 गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले आहे.

त्यात शाडूमातीच्या व पीओपीच्यामूर्तींचा समावेश आहे. नागरिकांनी तसेच, मंडळांनी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात मूर्तीचे विसर्जन करावे, पर्यावरणाचे संरक्षण व नदी पात्राचे प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती व निर्माल्याचे विसर्जन योग्य पद्धतीने करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

एकूण 22 हजार 647 किलो निर्माल्य जमा

विसर्जनाच्या काळात निर्माल्य नदी, तलाव किंवा अन्य जलस्रोतांमध्ये जाऊ नये, यासाठी महापालिकेकडून निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन घाटांवर निर्माल्य कुंड व कंटेनर ठेवण्यात आले आहेत. त्यात हार, फुले, केळीचे पाने, पूजेचे तसेच, सजावटीचे साहित्य जमा केले जात आहे. 23 सप्टेंबरपर्यंत एकूण 22 हजार 647.25 किलो निर्माल्य जमा झाले आहे.

Pimpri Chinchwad Ganesh Visarjan
YCM Hospital Medicine Shortage: वायसीएम रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णांना बाहेरून महागडी औषधे खरेदीची वेळ

पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देण्याचे आवाहन

विसर्जनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. 25) मोठ्या संख्येने नागरिक घरगुती तसेच, सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करतात. गणेशभक्तांसह कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, विसर्जनासाठी सुरक्षित ठिकाणांचा वापर करावा, वैद्यकीय, अग्निशमन, जीवरक्षक व अन्य आपत्कालीन पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

अ, ड आणि फ क्षेत्रीय कार्यालयांत कृत्रिम हौद

अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 10, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 11 आणि फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 20 कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. अ क्षेत्रीय कार्यालयाच्याहद्दीत स्पाईन रोड, यमुनानगर, मोहननगर सांस्कृतिक भवन, गणेश तलावाजवळ, सेक्टर 26 प्राधिकरण, नियोजित महापौर निवास मैदान, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 27 येथे कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news