Pimpri Chinchwad Ward Offices: पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या क्षेत्रीय कार्यालयांचा कारभार अडखळला; मनुष्यबळ, यंत्रसामग्रीचा अभाव

‘ज’ आणि ‘ल’ कार्यालयांत सुविधांची वानवा; नागरिकांसह नगरसेवकांचा संताप, कामांचा खोळंबा
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

मिलिंद कांबळे

पिंपरी: लोकसंख्या वाढीचे कारण पुढे करून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठ ऐवजी दहा क्षेत्रीय कार्यालय तयार करून कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेल्या ताथवडे येथील ‘ज’ आणि संत तुकारामनगर, पिंपरी येथील ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक प्रमाणात मनुष्यबळासह यंत्रसामग्री व वाहने प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने क्षेत्रीय हद्दीत दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Heavy Vehicle Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये जड वाहनांचा बिनधास्त वावर; वाहतूक निर्बंध कागदावरच?

महापालिकेत दुसर्‍यांदा सत्तेत आलेल्या भाजपने अस्तित्वात असलेल्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभागांची तोडफोड करत दहा नवीन क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना केली. सर्व दहा ठिकाणी भाजपाचे नगरसेवक अध्यक्ष होतील, अशा प्रकारे सत्ताधार्‍यांनी क्षेत्रीय कार्यालयांची फोडाफोडी केली. विरोधकांचा विरोध डावलून 1 जुलै 2026 पासून दहा क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कामकाज सुरू करण्यात आले. दहा ठिकाणी क्षेत्रीय समिती अध्यक्ष हे भाजपचे असून, ती बिनविरोध निवड 13 जुलैला करण्यात आली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Industrial Workers: पिंपरी-चिंचवडच्या कामगारांची रोजची कसरत; प्रवासाचा त्रास, कारखान्यांत उकाडा अन् सुरक्षेचे प्रश्न

नवीन ‘ल’ आणि ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयांत आवश्यक दालने, कार्यालय, सभागृह व इतर व्यवस्था करून घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, एका क्षेत्रीय अधिकार्‍यांकडे दोन-दोन क्षेत्रीय कार्यालयांचा पदभार असल्याने त्यांना काम करण्यात मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. तसेच, पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नेमण्यात आले नसल्याने कामांचा खोळंबा होत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेजलाईन, विद्युत, रस्ते आदी प्रमुख कामांसाठी मनुष्यबळांची कमतरता असल्याने तक्रारींची संख्या वाढली आहे. पूर्वी सहज होणारी कामे आता दहा-दहा दिवस होत नसल्याने नागरिकांसह नगरसेवकही वैतागले आहेत. त्याबाबत सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही रोष व्यक्त करत आहेत.

नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यापूर्वी त्या भागासाठी आवश्यक प्रमाणात अधिकारी व कर्मचारी नियुक्ती करणे आवश्यक होते. तसेच, कार्यालयात आवश्यक त्या सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. मात्र, घाईघाईत कार्यवाही केल्याने प्रत्यक्षात नवीन कार्यालय हद्दीतील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकाच कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत. तक्रारी करूनही कामे वेळेत होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Chinchwad Kunal Market Fire: चिंचवडच्या कुणाल मार्केटमधील आगीनंतर रहिवासी अंधारात; चार दिवसांपासून वीज-पाणी बंद

नवीन क्षेत्रीय कार्यालयांची घाई का ?

नवीन कार्यालये सुरू करून त्यांना आवश्यक साधनेच उपलब्ध नसतील, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती ही केवळ प्रशासकीय रचना न राहता नागरिकांना वेळेत व प्रभावी सेवा देणारी यंत्रणा बनली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याची घाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मनुष्यबळासह यंत्रसामग्री अपुरी

वाढत्या लोकसंख्येचा व नागरीकरणाचा विचार करून ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक प्रमाणात घंटागाड्या, कचरा संकलनासाठी वाहने, स्वच्छता कर्मचारी व इतर यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावेत. कचरा संकलन करणार्‍या वाहनांच्या फेर्‍या वाढवाव्यात. यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छता प्रभावीपणे राबवावी. गटारांची स्वच्छता करण्यासाठी जेटिंग मशीनसह इतर यंत्रसामग्रीची कमतरता दूर करावी. सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाऊ नये, असे नगरसेवक राहुल कलाटे यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Diwali Faral: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळी फराळाला मागणी; रेडिमेड फराळाच्या विक्रीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ

क्षेत्रीय अधिकारीच दररोज येत नसल्याची तक्रार

संत तुकारामनगर, पिंपरी येथील ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारीच येतच नाहीत. त्यांच्याकडे दुसर्‍या क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार आहे. तेथे तिकडेच असतात. येथील दैनंदिन कामकाज खोळंबून आहेत. वेळेत निर्णय व कामे होत नसल्याने प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. या संदर्भात आयुक्तांकडे तक्रार करूनही त्यात काही सुधारणा झालेली नाही, असा आरोप नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केला आहे.

अधिकारी संख्या कमी; दोन क्षेत्रीयचा तात्पुरता पदभार

सहाय्यक आयुक्त पदासाठी अधिकारी सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे दोन क्षेत्रीय अधिकार्‍यांकडे प्रत्येकी दोन क्षेत्रीय कार्यालयांचा तात्पुरता पदभार आहेत. अधिकारी उपलब्ध झाल्यानंतर आयुक्तांची मान्यता घेऊन, त्या दोन क्षेत्रीय कार्यालयास स्वतंत्र सहाय्यक आयुक्त नेमला जाईल, असे महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

क्षेत्रीय कार्यालय : समाविष्ट प्रभाग

  • अ- 13, 14, 15

  • ब- 17, 18, 19

  • क- 2, 9, 10

  • ड- 21, 27, 28, 29

  • ई- 3, 4, 5

  • फ- 1, 11, 12

  • ग- 22, 23, 24

  • ह- 30, 31, 32

  • ज - 16, 25, 26

  • ल - 6, 7, 8, 20

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.