Pimple Gurav Traffic Congestion: पिंपळे गुरवच्या कल्पतरू चौकातील कोंडी फोडण्यासाठी बॅरिकेट्स; लेन सिस्टीम सुरू

सकाळी-सायंकाळी १५ ते २० मिनिटे वाहनचालक अडकतात; वाहतूक पोलिसांची गर्दीच्या वेळी नियुक्ती, कायमस्वरूपी उपायांची मागणी
Kalpataru Chowk
Kalpataru ChowkPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपळे गुरव: शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला भाग असलेल्या पिंपळे गुरव येथील कल्पतरू चौकात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी अखेर प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. या चौकात नवीन बॅरिकेट्स बसविण्यात आले असून, यामुळे वाहनांच्या हालचालींना शिस्त लागून वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Kalpataru Chowk
Pune Inner Ring Road Land Acquisition: पुणे इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग; मुळशी, हवेलीत जमीन मोजणीच्या तारखा निश्चित

कल्पतरू चौकातून पुढे भोसरी, वल्लभनगर आणि पिंपरीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तसेच भोसरी ते वाकड बीआरटी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावर खासगी बसेस आणि इतर प्रवासी वाहनांचीही सतत ये-जा सुरू असते. त्यातच रस्ता अरुंद असल्याने सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. चौकात सिग्नल असूनही वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

Kalpataru Chowk
PMPML Electric Bus Battery Problem: पीएमपीच्या ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज; प्रवाशांना रस्त्यात उतरावे लागते

बॅरिकेट्समुळे शिस्त लागणार

या चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहनांच्या अनियंत्रित हालचालींना आळा घालण्यासाठी नवीन बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. या व्यवस्थेमुळे वाहतुकीचा प्रवाह अधिक नियोजनबद्ध होण्यास मदत होऊ शकते आणि वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, बॅरिकेट्सची ही व्यवस्था प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते, हे आगामी काही दिवसांतील वाहतुकीच्या स्थितीवरून स्पष्ट होईल.

Kalpataru Chowk
PMRDA Housing Scheme Fraud: बनावट रहिवासी दाखल्यावर पीएमआरडीएचा फ्लॅट लाटल्याचा आरोप; पिंपरीत तिघांवर गुन्हा

कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज

कल्पतरू चौकातून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने यावर ठोस पावले उचलण्याची गरज आहे. नवीन बॅरिकेट्समुळे तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी बीआरटी मार्ग आणि अरुंद रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन, वाहनांची शिस्त आणि पूरक उपाययोजनांमुळेच या चौकातील कोंडीवर दीर्घकालीन तोडगा निघू शकतो.

Kalpataru Chowk
PCMC Revenue Collection 2026-27: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाला ब्रेक; सहा महिन्यांत उद्दिष्टाच्या ४५ टक्केच वसुली

कल्पतरू चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी नवीन बॅरिकेट्स लावून लेन सिस्टीम सुरू केली आहे. यामुळे बीआरटी रोडवरून पिंपळे गुरवकडे जाणाऱ्या वाहनांना योग्य शिस्त लागेल. गर्दीच्या वेळी या चौकात वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत ठेवण्याला आमचे प्राधान्य आहे. वाहनचालकांनी शिस्त पाळून सहकार्य करावे.

चंद्रकांत वाबळे, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग.

सकाळ, संध्याकाळ कल्पतरू चौकातून जाताना १५ ते २० मिनिटे कोंडीत अडकून पडावे लागते. बीआरटी रोडवरून येणाऱ्या वाहनांची गर्दी आणि अरुंद रस्ता यामुळे परिस्थिती बिकट होते. प्रशासनाने बॅरिकेट्स लावून चांगला प्रयत्न केला आहे, पण येथे वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती असणे आवश्यक आहे, तरच वाहनचालक शिस्त पाळतील.

भीमराव पाटील, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news