Pimpri Chinchwad Municipal Website Update: अखेर महापालिका संकेतस्थळावर महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची माहिती झळकली

पुढारीच्या वृत्तानंतर प्रशासनाची तातडीची हालचाल; नागरिकांकडून समाधान व्यक्त
Pimpri Chinchwad Municipal Website Update
Pimpri Chinchwad Municipal Website UpdatePudhari
Published on
Updated on

पिंपरी: महापालिकेत अधिकृत संकेतस्थळावर अखेर महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते यांची छायाचित्रे, माहिती व संपर्क क्रमांक झळकले आहेत. त्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Website Update
Pimpri Student Aadhaar UDISE Error: पिंपरीतील हजारो विद्यार्थी आधार-यू-डायस नोंदणी गडबडीत शालेय नोंदी संकटात

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवट जाऊन लोकप्रतिनिधींचे राज्य शुक्रवार (दि. 6) पासून सुरू झाले. महापौरपदी रवी लांडगे व उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच, सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यास आठवडा उलटूनही महापालिकेच्या अधिकृत लािलळपवळर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर केवळ महापौराचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते.

Pimpri Chinchwad Municipal Website Update
Pimpri Nigdi Metro Delay: पिंपरी–निगडी मेट्रो काम संथ गतीने, 2027 अखेर पूर्ण होण्याची शक्यता

मात्र, त्यांची माहिती देण्यात आली नव्हती. तसेच, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते व विरोधी पक्षनेत्यांचे छायाचित्रे व माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे महापालिकेत अद्याप आयुक्तच बॉस असल्याचा संदेश नागरिकांमध्ये जात होतो. या माहिती व तंत्रज्ञान विभागांच्या निष्काळजीपणामुळे पदाधिकाऱ्यांची माहिती तात्काळ अपडेट करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली गेली नव्हती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

Pimpri Chinchwad Municipal Website Update
PMPML Electric Bus Fire: चाकणमध्ये पीएमपीएमएलची इलेक्ट्रिक बस पेटली; 50 प्रवाशांचे प्राण वाचले

त्यासंदर्भात पुढारीने -महापालिका संकेतस्थळावर अद्याप आयुक्तच बॉस - असे छायाचित्रासह वृत्त शुक्रवारी (दि.13) प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाची एकच खळबळ उडाली. माहिती व तंत्रज्ञान विभागाने तातडीने कार्यवाहीस सुरुवात केली. नगर सचिव विभागाकडून पदाधिकाऱ्यांची माहिती घेतली.

Pimpri Chinchwad Municipal Website Update
Pimpri Chinchwad Regional Offices: पिंपरी-चिंचवडमध्ये क्षेत्रीय कार्यालये 8 वरून 10 करण्याची मागणी; आयुक्तांचा नकार

तसेच, जनसंपर्क विभागाकडून पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे घेतले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे, दालनाचा पत्ता, संपर्क क्रमांक व मेल आयडी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच, महापौरांच्या नावात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news