Pimpri Mobile While Driving Fine: पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईल वापरून वाहन चालवणाऱ्यांवर धडक कारवाई; ११ हजारांहून अधिक चालकांना दंड

रील्स, स्टंट आणि हेडफोन वापरामुळे अपघात वाढले; १.६८ कोटी रुपयांचा दंड वसूल
Mobile While Driving
Mobile While DrivingPudhari
Published on
Updated on

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: वाहन चालवताना मोबाइल वापरण्यावर बंदी असली तरीही अनेकजण हेडफोन लावून वाहन चालविताना दिसतात. तर, दुचाकी चालविताना अनेकांच्या हातात मोबाईल असतो. त्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. १ जानेवारी ते १५ जून २०२६ पर्यंत वाहतूक पोलिसांकडून ११ हजार १४८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ६८ लाख ८३ हजार एवढा दंड आकारण्यात आला आहे.

Mobile While Driving
Pimpri Snake Bite Treatment: पिंपरी-चिंचवडमध्ये सर्पदंशाचा धोका वाढला; प्राथमिक आरोग्य केंद्रांत ‘ॲन्टिवेनम’चा तुटवडा

शहरात दररोज सरासरी दोन ते तीन छोटे-मोठे अपघात होत आहेत. काही वेळेस मृत्यूदेखील होतात. बहुतांश अपघात वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्यामुळे होत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तरीही वाहन चालविताना स्टंट करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, रेसिंग यासारखे प्रकार घडून येताना दिसतात. त्यामुळे जानेवारी ते १५ जून २०२६ या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून ११ हजार १४८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ६८ लाख ८३ हजार एवढा दंड आकारण्यात आला आहे.

Mobile While Driving
Pimpri Chinchwad Traffic Police: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; १५ दिवसांत १९ हजार वाहनांवर कारवाई

काय सांगतो कायदा..

वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास मोटार वाहन आधिनियम २५० (अ) नुसार संबधित वाहनधारकास किमान एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. मोटार वाहन आधिनियम १८४ नुसार वाहन वेगाने तसेच निष्काळजीपणे चालविणाऱ्यास दोन हजार रुपये दंड आकारला जातो. भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ अन्वये निष्काळजीपणे तसेच वाहतूक नियमांचा भंग करून वाहन चालविणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येते.

Mobile While Driving
Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडमध्ये 15% पाणी कपात; पवना धरणात केवळ 19% साठा

रील्सच्या नादात वाढताहेत अपघात

सध्याच्या तरुणाईला रिल्स तयार करण्याची आणि सोशल मीडियावर प्रसिध्द होण्याचे व्यसन लागले आहे. आपण तयार केलेल्या व्हिडीओला जास्तीत जास्त लाईक मिळाव्यात, म्हणून अनेकजण स्टंट करतात आणि स्टंट करताना वेगात वाहन पळवितात. तर, काही वेळेस समोर येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा पध्दतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

Mobile While Driving
Pimpri Water Cut: पिंपरी-चिंचवडमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू; एल-निनोचा परिणाम, उद्यापासून अंमलबजावणी

वाहने चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असली तरी हजारो वाहनचालक नियमाचे उल्लंघन करतात. मात्र, यामुळे आपले लक्ष विचलित होते आणि आपल्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइल वापरणाऱ्या चालकांवर योग्य ती कारवाई केली जात आहे.

विक्रांत देशमुख, पोलिस उपआयुक्त वाहतूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news