Pimpri Chinchwad Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापौर-उपमहापौर निवड 6 फेब्रुवारीला

2 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज; भाजपाकडून महापौरपदासाठी कोणाला संधी याकडे शहराचे लक्ष
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी पहिली विशेष सभा 6 फेबुवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी 2 फेबुवारीला दुपारी 3 ते सायंकाळी 5 यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Election: उमेदवारांचा वारेमाप खर्च, पालिकेचा खर्च 50 कोटींच्या पुढे

विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने येत्या 6 फेबुवारीला महापालिकेची पहिला विशेष सभा होणार आहे. ती सकाळी अकराला महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे हे असणार आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PC Shield App: पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘पीसी शील्ड’ ॲप; 1,585 सराईत गुन्हेगारांचे मॅपिंग पूर्ण

त्यासाठी 2 फेबुवारीला दुपारी 3 ते सायंकाळी 5 यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील नगरसचिव कार्यालयात स्वीकारण्यात येतील. दरम्यान, निवडणुकीत भाजपाचे 85 नगरसेवक निवडून आले असून, महापालिकेत दुसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत. भाजपाकडून महापौरपदासाठी कोणाला संधी दिली जाते, याची शहरवासीयांत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news