Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये हलक्या सरी; पावसाऐवजी वाढला उकाडा, नागरिकांची निराशा

पिंपरी-चिंचवड शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या मात्र अपेक्षित पावसाऐवजी उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागानुसार 23 जूननंतर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे
Rainy Sky
Rainy SkyPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोमवार (दि. २२) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या; मात्र ऊन पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याऐवजी उकाडा वाढला.

Rainy Sky
PCMC Zero Waste: पिंपरी-चिंचवडमध्ये झिरो वेस्ट उपक्रमाला प्रतिसाद; 11.47 टन कचऱ्याचे विलगीकरण

सोमवार सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जोरदार पाऊस पडेल, अशी आशा असतानाच पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर दिवसभर कडक ऊन आणि उकाडा यांनी नागरिकांची निराशा झाली.

Rainy Sky
Pimpri Chinchwad Land Scam: पिंपरी-चिंचवड महापालिका जागा खासगी संस्थांना भाडेतत्त्वावर; भूखंड वाटपावर वाद

जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आल्यानंतरही पाऊस नाही. शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. तसेच यंदा उन्हाळाही खूपच कडक राहिल्याने नागरिकांना आता पावसाची आशा लागली आहे. दररोज ३८ ते ४० अंश कमाल तापमान आणि रात्रीही उष्ण त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. सध्या तापमान ३५ अंश इतके असले तरी उकाडा आहे. २३ जूननंतर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पावसाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news