Pimpri Chinchwad HSC Result 2026: पिंपरी-चिंचवडचा बारावी निकाल 94.86%; मुलींची सरशी

मागील वर्षाच्या तुलनेत घट; मावळ तालुक्याचा निकाल 95.13%
Pimpri Chinchwad HSC Result 2026
Pimpri Chinchwad HSC Result 2026Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेबुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी चा निकाल शनिवार (दि. 2) ऑनलाइन जाहीर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 94.86 टक्के इतका लागला आहे.

Pimpri Chinchwad HSC Result 2026
Pimpri Chinchwad Industry Fuel Crisis: इंधन टंचाईतही पिंपरी-चिंचवड उद्योगांचा ‘इलेक्ट्रिक’ पर्याय

यामध्ये मुलांचा 93.29 टक्के तर मुलींचा 96.56 टक्के निकला लागला. गेल्या वर्षी 96.55 टक्के निकाल लागला होता. यंदा निकालामध्ये दोन टक्क्यांनी घट झाली आहे. शहरामध्ये बारावीच्या एकूण 19 हजार 540 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.

Pimpri Chinchwad HSC Result 2026
Stray Dogs Problem: भोसरीत भटकी कुत्री जोमात; प्रशासन कोमात

यामध्ये 10 हजार 176 मुले आणि 9 हजार 364 मुली होत्या. यापैकी 10 हजार 78 मुले आणि 9 हजार 303 मुलींनी परीक्षा दिली. यापैकी 18 हजार 385 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 9 हजार 402 मुले आणि 8 हजार 983 मुली उत्तीर्ण झाल्या.

Pimpri Chinchwad HSC Result 2026
RTE Admission Bribery Case: आरटीई प्रवेशासाठी लाच मागणाऱ्यास पकडले

मंडळाच्या वेबसाईटवर शनिवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि लॅपटॉपवर आपला निकाल पाहिला. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी मित्र मैत्रिणींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. पालक आणि नातेवाईकांनी देखील मुलांचे अभिनंदन केले. व्हॉट्‌‍स ॲपवर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

Pimpri Chinchwad HSC Result 2026
DG Insignia Award: पोलिस आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

मावळ तालुक्याचा निकाल 95.13 टक्के

मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल 95.13 टक्के लागला. यावर्षी मावळ तालुक्यातील एकूण 4 हजार 130 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी 2015 मुले आणि 2097 मुलींनी परीक्षा दिली. मुलांचा निकाल 93.15 तर मुलींचा निकाल 97.04 टक्के लागला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news