Pimpri Chinchwad Ganesh Visarjan DJ Noise: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

सांगवीत सर्वाधिक ९ प्रकरणे; शिरगाव-परंदवडीत डीजे साऊंड सिस्टिमसह वाहन जप्त
DJ Police Action
DJ Police ActionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीत निर्धारित ध्वनीमर्यादा झुगारून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणे मंडळे आणि डीजे चालकांना महागात पडले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवार (दि. २१) निघालेल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सहा पोलिस ठाण्यांत एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सांगवी पोलिस ठाण्यात सर्वाधिक नऊ गुन्ह्यांची नोंद झाली असून, विविध ठिकाणी डीजे साऊंड सिस्टिमसह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

DJ Police Action
Pimpri Chinchwad Water Park: पिंपरी-चिंचवड महापालिकेला ठेकेदाराचा ‘धक्का’; वॉटर पार्कचे ८३.३७ लाख भाडे थकीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. उत्सवापूर्वी पोलिस आयुक्त स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करावा; मात्र डीजेसारख्या उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांचा कर्णकर्कश आवाज लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करू नये आणि ध्वनिप्रदूषण टाळावे, अशा स्पष्ट सूचना मंडळांना देण्यात आल्या होत्या.

DJ Police Action
Pimpri Chinchwad Mahaprasad: पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार केटरर्स; महाप्रसादासाठी नोंदणी अवघी २१५ जणांची!

पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार परिमंडळीय पोलिस उपायुक्तांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. गणेशोत्सवासाठी आवश्यक परवानग्यांसह ध्वनिप्रदूषणाबाबतचे नियम, न्यायालयीन निर्देश आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती मंडळांना देण्यात आली होती. मात्र, सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजे चालक आणि मालकांविरोधात गुन्हे दाखल करून वापरण्यात आलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला.

DJ Police Action
Chakan Gutkha Seizure: चाकणमध्ये ९३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; कंटेनरचालकाला अटक

सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत डिजेचा दणदणाट झाला. येथे एकाच दिवशी नऊ गुन्हे दाखल झाले. त्याखालोखाल तळेगाव दाभाडे येथे पाच गुन्हे, एमआयडीसी भोसरी आणि शिरगाव-परंदवडी येथे प्रत्येकी दोन, तर तळेगाव एमआयडीसी आणि बावधन येथे प्रत्येकी एका प्रकरणात कारवाई झाली.

शिरगावमध्ये साऊंड सिस्टिमसह वाहन जप्त

शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातव्या दिवशी ३८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईत डीजे साऊंड सिस्टिम, दोन मिक्सर, दोन ॲम्प्लीफायर तसेच एक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.

DJ Police Action
Ashok Belapurkar Cyclist: ८४व्या वर्षीही सायकलवरून रोज १०० किमी; पिंपरी-चिंचवडचे ‘सायकलपटू आप्पा’ अजूनही जोमात!

गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात साजरा करताना ध्वनीमर्यादा आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उच्च आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर कारवाई केली जाईल. गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करून ध्वनिप्रदूषण टाळावे.

देवेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिरगाव-परंदवडी पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news