Chakan Gutkha Seizure: चाकणमध्ये ९३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; कंटेनरचालकाला अटक

नाशिकहून पुण्याकडे येणारा कंटेनर तळेगाव चौकात पकडला; आणखी चार आरोपी निष्पन्न, आंतरराज्यीय साखळीचा तपास
Chakan Gutkha Seizure
Chakan Gutkha SeizurePudhari
Published on
Updated on

पिंपरी: नाशिककडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुमारे ९३ लाख रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे. चाकण उत्तर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने तळेगाव चौक येथे शुक्रवार (दि. १८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सापळा रचून कंटेनर अडवला. या कारवाईत चालकाला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले आहेत.

Chakan Gutkha Seizure
Ashok Belapurkar Cyclist: ८४व्या वर्षीही सायकलवरून रोज १०० किमी; पिंपरी-चिंचवडचे ‘सायकलपटू आप्पा’ अजूनही जोमात!

प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीमागे आंतरराष्ट्रीय साखळी असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नफीस मेहबूब खान (४०, रा. फिरोजपूर, हरियाणा) असे अटक केलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चाकण उत्तर पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके काम करीत आहेत.

Chakan Gutkha Seizure
Dehugaon Crime: देहूगावात कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; पतीनेही स्वतःवर वार करून गॅलरीतून उडी मारली

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चाकण उत्तर पोलिसांशी समन्वय साधून संयुक्त कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार, चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह तळेगाव चौक परिसरात सापळा रचला. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाशिक-पुणे मार्गावरून नाशिककडून पुण्याच्या दिशेने येणारा टाटा कंपनीचा कंटेनर पोलिसांच्या निदर्शनास आला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कंटेनर संशयावरून अडवण्यात आला.

Chakan Gutkha Seizure
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात कांदा, लसूण, आले तेजीत; लिंबू २०० रुपये किलो

पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. पंचनामा करून हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची किंमत सुमारे ९३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. कंटेनर चालक नफीस खान याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध चाकण उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Chakan Gutkha Seizure
Pimpri Chinchwad NDPS Wanted Accused: पिंपरी-चिंचवडमध्ये एनडीपीएसचे ७३ आरोपी ‘वॉन्टेड’; न्यायालयीन प्रक्रियेतून कोंडी

कंटेनर हरियाणा येथील चालक चालवत असल्याने तसेच तो नाशिककडून पुण्याच्या दिशेने येत असल्याने या वाहतुकीचे धागेदोरे राज्याबाहेरील पुरवठादारांपर्यंत पोहोचतात का, याचाही तपास केला जात आहे. जप्त केलेला गुटखा नेमका कोठून आणण्यात आला, पुण्यात किंवा अन्य भागात कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता, वाहतुकीसाठी कंटेनर कोणी उपलब्ध करून दिला आणि आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले, या बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेल्या अन्य चार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक, पुरवठा आणि वितरण करणारी संपूर्ण साखळी उघड करण्याच्या दृष्टीने चाकण उत्तर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उपायुक्त परिमंडळ-३ मारुती जगताप, सहायक पोलिस आयुक्त चाकण विभाग योगेश रांजणकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त दिगंबर भोगावडे, चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news